rohit sharma google
Sports

Rohit Sharma Statement: पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवूनही रोहित शर्मा नाराज! सामन्यानंतर म्हणाला...

India vs Pakistan, Rohit Sharma: भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात विजय मिळवला आहे. मात्र विजय मिळवूनही कर्णधार रोहित शर्मा नाराज असल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये स्पर्धेतील १९ वा सामना नासाऊ काऊंटी आतंरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने या सामन्यात ६ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने पाकिस्तानसमोर अवघ्या १२० धावांचं आव्हान ठेवलं होतं.

या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला केवळ ११३ धावांपर्यंत मजल मारता आली. या विजयानंतर क्रिकेट फॅन्समध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. तर दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा नाराज असल्याचं दिसून आलं आहे.

हा सामना झाल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, ' आम्ही या सामन्यात फलंदाजीत चांगली कामगिरी करु शकलो नाही. आम्ही मधल्या षटकांमध्ये मजबूत स्थितीत होतो. मात्र त्यानंतर आम्हाला भागीदारी करता आली नाही. आम्ही आधीच यावर चर्चा केली होती की, या खेळपट्टीवर १ धावही अतिशय महत्वाची असणार आहे. खेळपट्टीतून मदत मिळत होती. तसं पाहायला गेलं,तर गेल्या सामन्यापेक्षा या सामन्यातील खेळपट्टी चांगली होती.'

गोलंदाजांचं केलं कौतुक

या सामन्यात भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले असले, तरीदेखील गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. रोहितने गोलंदाजांचं कौतुक करत म्हटले की, ' अशाप्रकारचं गोलंदाजी आक्रमण संघात असताना नेहमीच आत्मविश्वास उंचावलेला असतो. सामना जेव्हा मध्यात येऊन पोहोचला. त्यावेळी आम्ही एकत्र आलो आणि म्हटलं की, हे आपल्यासोबत होऊ शकतं तर त्यांच्यासोबतही होऊ शकतं. सर्वांनी थोडं थोडं योगदान दिलं तर मोठा फरक पडेल.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना रिषभ पंतने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. तर अक्षर पटेलने २० धावांची खेळी केली. भारतीय संघाचा डाव १९ षटकात ११९ धावांवर आटोपला. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी १२० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला ११३ धावा करता आल्या. यासह भारतीय संघाने हा सामना ६ धावांनी आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: या अधिवेशनात १० विधेयकं मांडणार- मुख्यमंत्री

Chalisgaon Fort : चाळीसगावपासून हाकेच्या अंतरावरील ५ किल्ले, सुट्टीत करा इतिहासाची सफर

Pune Accident: पुण्यात भयंकर अपघात! फादर्स डेच्या दिवशी काळाचा घाला, बाप-लेकीला भरधाव वाहनानं चिरडलं

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला गुलाबपाणी लावल्याने काय होते? जाणून घ्या 5 आश्चर्यकारक फायदे

PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनात मोठे फेरबदल; एकाचवेळी २७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

SCROLL FOR NEXT