भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये साखळी फेरीतील शेवटचा सामना सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकअखेर २४९ धावा केल्या. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडने दमदार सुरुवात केली.
यादरम्यान विल यंगला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. मात्र वरुण चक्रवर्तीने झेल तर सोडलाच त्यानंतर फुटबॉल खेळताना दिसून आला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
तर झाले असे की, विल यंगने फ्री हिट चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू हवेत गेला. मिड ऑनला क्षेत्ररक्षण करत असलेल्या वरुण चक्रवर्तीला सोपा झेल घेण्याची संधी मिळाली होती. चेंडू हवेत जाताच त्याने झेल घेण्यासाठी धाव घेतली आणि चेंडूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तो चेंडूच्या जवळ पोहचू शकला नाही.
त्यामुळे हा सोपा झेल त्याच्या हातून सुटला. झेल सोडल्यानंतर त्याने चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र या नादात चेंडू पायाला लागला आणि सीमारेषेपार गेला. त्यामुळे न्यूझीलंडला फुकटच्या ४ धावा मिळाल्या.
हा चौकार गेल्यानंतर, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. गोलंदाजी करत असलेला हार्दिक पंड्या आश्चर्यचकीत दिसून आला. तर कर्णधार रोहित शर्मा संताप व्यक्त करताना दिसून आला. भारतीय संघाला या डावात धावांचा डोंगर उभारता आला नव्हता, त्यामुळे १-१ धाव भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची होती. असं असताना, चक्रवर्तीने न्यूझीलंडला ४ धावा गिफ्ट म्हणून दिल्या. त्यामुळे रोहितने अशी रिअॅक्शन दिली.
या सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात आला होता. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना श्रेयस अय्यरने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली. तर हार्दिक पंड्याने ४५ धावांची खेळी केली. तर अक्षर पटेलने ४२ धावा केल्या. भारतीय संघाला २४९ धावा करता आल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.