भारतीय संघाचा कर्णधार बदलला, चौथ्या सामन्यासाठी कशी असेल प्लेइंग इलेव्हन?  saam tv
Sports

Ind vs NZ : टीम इंडियाचा कॅप्टन बदलला; रोहित शर्माचा सलामीचा भिडू बदलणार, कशी असेल संभाव्य प्लेइंग इलेव्हन?

Ind vs NZ fourth odi shreyas iyer to captain team india : भारत- न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील चौथा सामना होणार आहे. त्यापूर्वीच संघाचा नायक म्हणजेच कर्णधार बदलला आहे. तसंच प्लेइंग ११ मध्येही अनेक बदल होण्याची शक्यता आहे.

Nandkumar Joshi

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील चौथा सामना उद्या, शुक्रवारी (13 नोव्हेंबर) होणार आहे. या सामन्यात भारताची प्लेइंग इलेव्हन बदलणार आहे. चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी भारतीय संघाचा कर्णधारही बदलण्यात आला आहे. शुभमन गिल आणि केएल राहुल चौथ्या सामन्यात खेळणार नाहीत. विशेष म्हणजे माजी कर्णधार रोहित शर्मा याला नवा ओपनिंग पार्टनर मिळणार आहे. मालिकेत २-० ने आघाडी घेतलेल्या भारतीय संघात इतके बदल झाल्यानंतर चौथ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

श्रेयस अय्यरकडं नेतृत्व

भारत-न्यूझीलंड सामना शुक्रवारी होणार आहे. अखेरच्या दोन सामन्यांत गिल आणि राहुल खेळणार नाहीत. याची घोषणा आधीच करण्यात आली आहे. कसोटी मालिकेच्या तयारीसाठी हे दोघे आधीच रवाना झाले आहेत. त्यामुळं कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे देण्यात आली आहे. तो पहिल्यांदाच वनडेत भारताचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळं आता रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार असा प्रश्न आहे.

रोहितचा सलामीचा जोडीदार कोण?

शुभमन गिलच्या अनुपस्थितीत रोहित शर्माच्या जोडीला सलामीला कोण येणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. भारताकडे दोन पर्याय आहेत. ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यापैकी एकाला संधी मिळू शकते. इशान किशन हा दोन सामन्यांसाठी उपकर्णधार आहे. त्यामुळं प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची जागा निश्चित असल्याचं मानलं जातंय. तर ऋतुराज गायकवाड याला सलामीला खेळवण्याची दाट शक्यता आहे. त्याला वनडे सामने खेळण्याची संधी खूप कमी मिळाली आहे. पण जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यानं तिचं सोनं केलंय. इशानला सलामीला खेळवला नाही तर, मधल्या फळीत तो फलंदाजीला येऊ शकतो.

भारतीय संघ

रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, इशान किशन, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर बरार, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, तिलक वर्मा, कुलदीप यादव, कुमार कुशाग्र, यश ठाकूर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेच्या वेळेत ४५ मिनिटांचा बदल; नवीन टाइम काय?

Maharashtra News Live Update: नागपूर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; १४३ किलो डोडा पावडरसह ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त

IMD Today Weather: तिहेरी संकट! १६ राज्यांना इशारा; जोरदार वारं, भयंकर गारठा आणि मुसळधार पाऊस; महाराष्ट्रात काय स्थिती?

Relationship Tips : नात्यात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री तर झाली नाही ना? जोडीदाराच्या 'मंकी ब्रँचिंग'ची ही ५ लक्षणे वेळीच ओळखा

Mumbai cocaine seizure: मेकअप आर्टिस्टच्या घरात आढळला कोकेनचा साठा! आंतरराष्ट्रीय तस्करीचं कनेक्शन समोर

SCROLL FOR NEXT