ravindra jadeja  twitter
Sports

IND vs NZ: जडेजाने एकाच ओव्हरमध्ये फिरवली मॅच; न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत -VIDEO

India vs New Zealand 3rd Test, Ravindra Jadeja: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यात रविंद्र जडेजाने एकाच ओव्हरमध्ये २ गडी बाद केले आहेत.

Ankush Dhavre

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला सुरुवातीलाच २ मोठे धक्के बसले. मात्र त्यानंतर यंगने संघाचा डाव सावरला. अखेर जडेजाने एकाच षटकात २ विकेट्स घेत न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत धाडला आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाकडून आकाश दीपने न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. डेव्होन कॉनव्हे ४ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने टॉम लेथमची दांडी गुल केली. न्यूझीलंडला सुरुवातीलाच २ मोठे धक्के बसले.

कॉनव्हे आणि लेथम पाठोपाठ भारतीय संघाला नडणारा रचिन रविंद्रही स्वस्तात माघारी परतला. ३ विकेट गेल्यानंतर, विल यंग आणि डॅरील मिशेलने मिळून संघाचा डाव सांभाळला. दोघांमध्ये ८७ धावांची भागीदारी झाली.

त्यानंतर ४५ व्या षटकात जडेजाने गेम फिरवला. ही भागीदारी पुढे जात असताना,जडेजाने या षटकातील दुसऱ्या चेंडूवर विल यंगला रोहितच्या हातून झेलबाद करत माघारी धाडलं. त्यानंतर ३ चेंडूंनंतर जडेजाने टॉम ब्लंडेलला क्लिन बोल्ड केलं. यासह न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत परतला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

न्यूझीलंड - टॉम लेथम (कर्णधार), डेवोन कॉनव्हे, विल यंग, रचिन रविंद्र, डेरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, इश सोढी, मॅट हेनरी, एजाज पटेल, विल्यम ओ’रुर्क.

भारत: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scam : राज्यपालांच्या PA च्या नावाने रेल्वेच्या VVIP तिकिटांचा घोटाळा! 'लोकभवन'च्या बनावट लेटरहेडचा वापर; ७ जणांना अटक

PF Transfer : जुनं PF खाते बंद झालं? EPFO च्या नव्या पोर्टलमुळे अडकलेले पैसे, Active UAN मध्ये ट्रान्सफर करणं झाले जास्त सोपं

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Lung cancer: तरूणांच्या शरीरात गपचूप घर करतो फु्फ्फुसांचा कॅन्सर; सुरुवातीची 5 लक्षणं वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: जांभळी साडी, नाकात नथ अन् कपाळावर चंद्रकोर; वैदेही परशुरामीचा मराठमोळा अंदाज

SCROLL FOR NEXT