क्रीडा

IND vs NZ, 2nd Test, Day 1: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, १६ धावांवर टीम इंडियाने गमावली १ विकेट

IND vs NZ, 2nd Test, Day 1: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुण्यात दुसरा कसोटी सामना खेळला जातोय. या कसोटीत मालिकेत टीम इंडिया ०-१ ने पिछाडीवर आहे. न्यूझीलंडने बेंगळुरू येथे खेळला गेलेला पहिला कसोटी सामना जिंकला होता.

Bharat Jadhav

भारत आणि न्युझीलंडच्या संघात कसोटी सामन्याची मालिका खेळली जात आहे. दुसरा कसोटी सामना पुण्यात खेळला जात आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानावर हा कसोटी सामना होत आहे. दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवसा भारताच्या नावावर राहिला. भारताने न्युझीलंडच्या संघाला २५९ धावांमध्ये गुंडाळलं. भारताच्या वॉशिंग्टन सुंदरने ७ विकेट आणि आर अश्विनने ३ विकेट घेतल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने १६ धावा केल्यात पण एक विकेटदेखील गमावलीय.

न्युझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २५९ धावा केल्या. न्युझीलंडकडून सर्वात जास्त धावा डेवोन कॉनवेने केल्या. त्याने ७६ धावांची खेळी केली. त्यानंतर रचिन रविंद्रने ६५ धावा केल्या. या डावात वॉशिंग्टन सुंदर भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने एकूण ७ विकेट घेतल्या. तर अश्विननेदेखील ३ विकेट घेतल्या. न्युझीलंडचा डाव आटोपल्यानंतर टीम इंडिया मैदानात उतरली होती. त्यावेळी भारतीय संघाची सुरुवात तशी चांगली झाली नाही. रोहित शर्मा खाते न उघडताच तंबूत परतला. भारताने आपली पहिली विकेट अवघ्या १ धाव संख्येवर गमावली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार भारताचे सरन्यायाधीश, 11 नोव्हेंबर रोजी घेतील शपथ

Congress First Candidate List : काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; देवेंद्र फडणवीसांविरोधात शिलेदार उतरवला, वाचा लिस्ट

INDw vs NZw ODI: भारतीय महिला संघाकडून न्युझीलंडला धोबीपछाड; ५९ धावांनी जिंकला सामना

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीचा निकाल बदलणारे 5 फॅक्टर; राज ठाकरे आणि जरांगेंचा कुणाला फटका? पाहा व्हिडिओ

Jharkhand Election: झारखंडात 'या' पाच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; पराभूत झाले तर संपेल राजकारणातील करिअर

SCROLL FOR NEXT