Ind vs nz 1st t20i ranchi stadium pitch report and Weather forecast SAAM TV
क्रीडा

IND vs NZ, 1st T20I: कशी आहे रांचीची खेळपट्टी आणि हवामान? टॉस जिंकणारा संघ घेईल हा निर्णय

IND vs NZ, 1st T20I: न्यूझीलंडविरुद्ध पहिला टी-२० सामना रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता सुरू होईल.

Chandrakant Jagtap

India vs New Zealand 1st T20I : टीम इंडीया शुक्रवारपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका (IND vs NZ) खेळणार आहे. नुकतंच एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला ३-० ने पराभूत केल्यानतंर भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला आहे. त्यामुळे ही टी-२० मालिकाही जिंकण्याचा टीम इंडियाचा (Hardik Pandya) उद्देश असेल. एकदिवसीय मालिकेचे नेतृत्त्व रोहित शर्माकडे होते, परंतु आता हार्दिक पांड्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचं नेतृत्त्व करेल. या मालिकेतील उद्या होणाऱ्या पहिल्या सामन्याकडे आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आहे.

रांचीमध्ये होणार पहिला सामना

एकदिवसीय मालिकेत टीम इंडीयाने न्यूझीलंडचा 3-0 असा व्हाईटवॉश केल्यानंतर आता संघाचे लक्ष तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेवर आहे. यातीलत पहिला टी-२० सामना रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये खेळवला जाईल. हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होईल.

रांचीची खेळपट्टी आणि हवामान

मीडिया रिपोर्टनुसार रांचीचे हवामान (Weather forecast) थंड असू शकते. 'अॅक्यूवेदर'नुसार शुक्रवारी 27 जानेवारीला रांचीमध्ये दिवसा सर्वोच्च तापमान 27 अंश असेल तर रात्री ते सुमारे 14 अंशांपर्यंत घसरणअयाची शक्यता आहे. तसेच ह्यूमिडिटी म्हणजेच आर्द्रता 74 टक्क्यांपर्यंत असू शकते. त्यामुळे सामन्यादरम्यान दव फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

टॉस जिंकणारा संघ घेईल हा निर्णय

रांचीचे स्टेडियम मोठे आहे आणि येथे मध्यमगती गोलंदाजांना चांगली मदत होते. या मैदानावर तुलनेने कमी धावसंख्येचा सामना होतो. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १५५ आहे आणि आतापर्यंत झालेल्या 28 टी-20 सामन्यांमध्ये फक्त एकाच सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला आहे. ही वस्तूस्थिती पाहता आणि दव फॅक्टर लक्षात घेता याठिकाणी नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Fashion Tips :हिवाळ्यात Cool अन् Cozy लूक हवाय? 'या' फॅशन टिप्स फॉलो करा, प्रत्येकजण तुम्हाला पाहून वेडा होईल

satyanarayan vrat 2024: सत्यनारायणाची पूजा करायचीय? या महिन्यातील हा दिवस शुभ, जाणून घ्या मुहूर्त आणि विधी

Kanguva Movie Review: दमदार ॲक्शनवाला सूर्या आणि बॅाबी देओलचा 'कांगुवा ' प्रदर्शित, प्रेक्षकांना कसा वाटला चित्रपट जाणून घ्या

Durga Serial: दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार दुरावा? मालिकेमध्ये नेमकं असं काय घडणार?

Gujarat : सुट्टीत मित्रांसोबत तुफान मजा करा, गुजरातच्या 'या' खास लोकेशन भेट द्या

SCROLL FOR NEXT