IND vs NZ 1st T20I  Saam tv
Sports

IND vs NZ 1st T20I : टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात चहलच्या जागी कुलदीप यादव खेळणार? कशी असेल भारताची प्लेईंग ११

पहिल्या सामन्यात चहलच्या जागी कुलदीप यादव खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

Vishal Gangurde

Ind vs NZ 1st T20 Ist : भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी-२० सामन्यांची मालिका २७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. टीम इंडिया एकदिवसीय मालिकेच्या सामन्यात न्यूझीलंडला जोरदार तडाखा दिला आहे. बीसीसीआयने टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियांच्या एकदिवसीय सामने खेळणाऱ्या आठ खेळांडूची निवड केलेली नाही. तर पहिल्या सामन्यात चहलच्या जागी कुलदीप यादव खेळण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

बीसीसीआयने टीम इंडियाच्या (Team India) एकदिवसीय सामना खेळणारा रोहित शर्मा, विराट कोहली,शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रीकर भरत, शाहबाज अहमद , रजत पाटीदार यांची निवड केली नाही.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला मालिका जिंकण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. पंड्याच्या नेतृत्वात श्रीलंकेविरोधात टी-२० मालिका २-१ च्या फरकाने जिंकली होती. आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थानावर कायम आहे. तर श्रीलंका ८ व्या स्थानावर आहे.

मिशेल सँटनर हा टीम न्यूझीलंडचं टी-२० मालिकेत नेतृत्व करणार आहे. न्यूझीलंडमधील ९ असे खेळाडू आहेत,ते खेळाडू टी-२० विश्वचषक खेळले आहेत. मात्र, तरीही न्यूझीलंडला (New Zealand) अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.

रांचीमध्ये होणार पहिला सामना

एकदिवसीय मालिकेत टीम इंडीयाने न्यूझीलंडचा 3-0 असा व्हाईटवॉश केल्यानंतर आता संघाचे लक्ष तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेवर आहे. यातीलत पहिला टी-२० सामना रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये खेळवला जाईल. हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होईल.

पहिला टी-२० सामन्याच्या भारत आणि न्यूझीलंडची संभ्याव्य प्लेईंग-११ कशी असेल?

टीम इंडिया

शुभमन गिल,पृथ्वी शॉ, राहुल त्रिपाठी, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुड्डा, उमरान मलिक, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह

टीम न्यूझीलंड

फिन अॅलन, डेव्हॉन कॉन्वे (यष्टीरक्षक), मार्क चापमॅन, ग्लेन फिलिप्स, डेरिल मिशेल, मायकल

ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), लॉकी फर्ग्यूसन, जैकब डफी, हेनरी शिपले, ब्लेअर टिकनर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT