Ind vs NZ 1st ODI/ICC-Twitter SAAM TV
Sports

Ind vs NZ : ३०६ धावा केल्या तरीही टीम इंडियाचा मानहानीकारक पराभव, ही आहेत ३ कारणे

न्यूझीलंडविरुद्ध धावांचा डोंगर उभारूनही टीम इंडियाचा पराभव का झाला? जाणून घ्या ही कारणे

Nandkumar Joshi

Ind vs NZ, 1st One Day Match Score : वनडे सामन्यात ३०७ धावांचं आव्हान खूप मोठं समजलं जातं. मात्र, ऑकलँडमध्ये हा धावांचा डोंगर उभारूनही टीम इंडियाचा मानहानीकारक पराभव झाला. न्यूझीलंडनं ३०७ धावांचं हे आव्हान लीलया पार केलं. सात विकेट राखून न्यूझीलंडनं हा सामना सहज खिशात घातला. या विजयामुळं न्यूझीलंड या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. अनुभवी फलंदाज केन विलियमसन आणि टॉम लॅथम हे दोघे न्यूझीलंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या दोघांनीही शतके ठोकली.  (Latest Marathi News)

न्यूझीलंडचा संघ विशाल धावसंख्येचं आव्हान घेऊन मैदानात उतरला. सुरुवातीची २० षटके भारतीय गोलंदाजांनी (Team India) वर्चस्व राखले. पण तरीही अखेरच्या ३० षटकांत सामन्याचं चित्र कसं बदललं? टीम इंडियाच्या या पराभवाची कारणे नेमकी काय आहेत? जाणून घेऊयात.

भारतीय जलदगती गोलंदाजांची सुमार कामगिरी

भारतीय संघानं सुरुवातीची २० षटके चांगली टाकली. न्यूझीलंडवर पूर्णपणे दबाव टाकला होता. १२० चेंडूंत न्यूझीलंडच्या केवळ ८८ धावा होत्या आणि तीन विकेट बाद केले होते. पण चेंडू जुना झाला तसं भारतीय गोलंदाजांची लाइन-लेंथ बिघडली. विलियमसन खराब फॉर्ममध्ये होता. मात्र, सुमार गोलंदाजीमुळं त्यानं हळूहळू मैदानात जम बसवला. लॅथमने आल्या आल्या स्फोटक फलंदाजी सुरू केली. भारतीय गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.

टीम कॉम्बिनेशन

भारताच्या पराभवाचं दुसरं मोठं कारण म्हणजे खराब टीम कॉम्बिनेशन. भारतानं प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ ५ खेळाडू खेळवले जे गोलंदाजी करू शकतील. वनडे आणि टी २० मध्ये कोणत्या एका गोलंदाजाचा दिवस खराब असतो. मात्र, तरीही भारतानं सहावा पर्यायी गोलंदाज खेळवला नाही.

न्यूझीलंडची अविस्मरणीय फलंदाजी

न्यूझीलंडने केलेली विस्फोटक फलंदाजी हे एक टीम इंडियाच्या पराभवाचं कारण आहे. टॉम लॅथमने धडाकेबाज शतक झळकावलं. केवळ ७६ चेंडूंत त्याने शतकी खेळी केली. लॅथम आणि विलियमसननं २०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी रचून संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! जन्मदात्या आई-वडिलांच्या डोक्यात मुलाने घातला वरवंटा; मृतदेहाचे तुकडे करत गोणीत भरले

Blouse for Every Saree: प्रत्येक बाईकडे असायला हवे कोणत्याही साडीवर परफेक्ट मॅच होणारे हे ७ प्रकारचे ब्लाउज

Slim Look In Saree: साडी नेसल्यावर जाड दिसता? ही १ टेकनिक वापरा, तुम्हीच दिसाल रेखीव

Maharashtra Live News Update: कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या वकिलावर गुन्हा दाखल

Maharashtra Politics : बंडखोरी रोखण्यासाठी जालीम उपाय; बंडखोरांची ठाकरे बंधू कोंडी करणार?

SCROLL FOR NEXT