IND VS IRE 2nd T 20 Team India Won (Photo -BCCI) SAAM TV
Sports

IND vs IRE 2nd T20: चौकार-षटकारांचा पाऊस, भारतानं मारली बाजी; आयर्लंडचे फलंदाजही शेवटपर्यंत झुंजले

टीम इंडियानं चुरशीच्या झालेल्या अखेरच्या लढतीत आयर्लंडचा पराभव केला.

साम ब्युरो

मुंबई: दीपक हुडाच्या तडाखेबंद शतकामुळं टीम इंडियानं दुसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात आयर्लंडचा अवघ्या ४ धावांनी पराभव केला. या विजयासह हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं दोन टी-२० सामन्यांची मालिका २-० अशा फरकाने जिंकली.

टीम इंडियानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दीपक हुडाचं शतक आणि संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ७ बाद २२५ धावा केल्या. हे तगडं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आयर्लंडच्या फलंदाजांनी शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली. अवघ्या ४ धावांनी त्यांना पराभूत व्हावं लागलं. (India Vs Ireland T 20 Series)

दीपक हुडा (Deepak Hooda) मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सीरीजचा मानकरी ठरला. त्याने याआधीच्या सामन्यातही ४६ धावांची खेळी केली होती.

आयर्लंडचा (Ireland) कर्णधार एंडी बालबर्नी याने ३७ चेंडूंत ६०, पॉल स्टर्लिंगने १८ चेंडूंत ४०, हॅरी टेक्टर याने २८ चेंडूंत ३९ आणि जॉर्ज डॉकरेल याने १६ चेंडूंत नाबाद ३४ धावा केल्या. भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने अखेरचे षटक वेगवान गोलंदाज उमरान मलिकला दिले. आयर्लंडला विजयासाठी अखेरच्या षटकात १७ धावांची गरज होती.

हार्दिक पंड्याने दाखवलेला विश्वास उमरान मलिक (Umran Malik) याने सार्थ ठरवला. तत्पूर्वी, हुडा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (Cricket) शतक ठोकणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला. त्याने ५७ चेंडूंत १०४ धावा कुटल्या. त्यात नऊ चौकार आणि सहा षटकार आहेत.

संजू सॅमसननं मिळालेल्या संधीचं सोनं केलं. त्याने ४२ चेंडूंमध्ये नऊ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ७७ धावांची तुफानी खेळी केली. सॅमसनला ऋतुराज गायकवाड जखमी झाल्याने संघात संधी मिळाली होती. हुडा आणि सॅमसननं आपल्या खेळीत बहारदार फटके लगावले. दरम्यान, भारताची सुरुवात चांगली होऊ शकली नव्हती. इशान किशन तीन धावा करून तंबूत परतला होता. त्यानंतर हुडा आणि सॅमसनने ८५ चेंडूंमध्ये १७६ धावांची जबरदस्त भागीदारी केली. त्यामुळे भारताला धावांचा डोंगर उभारता आला.

हुडाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले शतक ५५ चेंडूंमध्ये पूर्ण केले. याआधी रोहित शर्मा, केएल राहुल आणि सुरेश रैना यांनी या प्रकारात शतक केले आहे. या दिग्गजांच्या यादीत आता हुडाचाही समावेश झाला आहे.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT