IND vs ENG: लिड्सवर विराट धोनीचा विक्रम मोडणार? जाणूना घ्या रेकाॅर्ड
IND vs ENG: लिड्सवर विराट धोनीचा विक्रम मोडणार? जाणूना घ्या रेकाॅर्ड Saam tv
क्रीडा | IPL

IND vs ENG: लिड्सवर विराट धोनीचा विक्रम मोडणार? जाणूना घ्या रेकाॅर्ड

वृत्तसंस्था

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना (Third Test Match) 25 ऑगस्टपासून लीड्समध्ये खेळला जाईल. लॉर्ड्सवर विजय नोंदवल्यानंतर भारतीय संघाचे लक्ष लीड्समध्ये विजय नोंदवने असणार आहे. जर भारताने हा सामना (Team India) जिंकला, तर ते मालिकेत 2-0 अशी अतुलनीय आघाडी घेतील. या सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) त्याचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) विक्रम मोडण्याची संधी आहे.

विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक कसोटी जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. कोहलीने इंग्लंडविरुद्ध नववा विजय नोंदवून धोनीची बरोबरी केली आहे. माहीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 कसोटी सामने जिंकले. आता जर कोहलीने लीड्स वर इंग्लंडच्या संघाला धूळ चारली तर तो धोनीचा विक्रम मोडू शकतो.

एका संघाविरुद्ध जास्त कसोटी जिंकण्याऱ्या कर्णधारांच्या यादित कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने दक्षिण आफ्रीकेविरुद्ध सात सामने जिंकले आहेत. BCCI अध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगूलीने झिंबाब्वेविरुद्ध सहा सामने जिंकले आहेत. त्यानंतर कोहलीने श्रीलंका आणि विंडीजविरुद्ध सहा-सहा सामने जिंकले आहेत. लॉर्ड्सवर विजय मिळवून कोहली कसोटी इतिहासातील चौथा सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. त्याने वेस्ट इंडिजचा दिग्गज क्लाइव्ह लॉयडला मागे टाकले होते.

लॉयडच्या नेतृत्वाखाली विंडीजने 36 कसोटी सामने जिंकले आहेत. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा हा 37 वा कसोटी विजय होता. विराटच्या पुढे आता फक्त दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथ (53 विजय), ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग (48 विजय) आणि माजी कांगारू कर्णधार स्टीव वॉ (41 विजय) आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

Nandurbar Crime: पुष्पा स्टाईलने सागवान लाकडाची तस्करी; जमिनीत पुरली ११ लाख रुपयांची लाकडं

SCROLL FOR NEXT