IND vs ENG Live Score 3rd Test Day 4 X
Sports

Eng vs Ind : फलंदाजांची आधी आक्रमक खेळी, नंतर गोलंदाजांनी लोळवलं; कसोटी सामन्यात टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध मोठा विजय

IND vs ENG Live Score 3rd Test Day 4 : इंग्लंड आणि टीम इंडियामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला धूळ चारली आहे.

Vishal Gangurde

IND vs ENG Live Score 3rd Test Day 4:

इंग्लंड आणि टीम इंडियामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला धूळ चारली आहे. टीम इंडियाने दिलेल्या आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी उतरेलल्या इंग्लंडच्या फलंदाजांना भारताच्या गोलंदाजांनी चांगलंच लोळवलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला १२२ धावांमध्ये गुंडाळलं. त्यानंतर टीम इंडियाने ४३४ धावांच्या फरकाने सामना जिंकला. (Latest Marathi News)

टीम इंडियाने इंग्लंडला पराभूत करत मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. मालिकेचा चौथा सामना २३ फेब्रुवारीला रांचीला होणार आहे. कसोटी सामन्याच्या इतिहासात टीम इंडियाने सर्वात मोठा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने याआधी न्यूझीलंडला वानखेडे स्टेडियमवर ३७२ धावांनी पराभूत केलं होतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात मार्कने ३३ धावा काढल्या. या सामन्यात भारतासाठी रविंद्र जडेजाने पाचवा गडी बाद केले आहे. तर कुलदीप यादवने दोन गडी बाद केले आहेत.

यशस्वी जैस्वालचं दुहेरी शतक

कसोटी सामन्याच्या चौथा दिवस टीम इंडियासाठी चांगला ठरला. यशस्वी जैस्वालच्या दुहेरी शतकामुळे टीम इंडियाने इंग्लंडला मोठं आव्हान दिलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना जेरीस आणलं. इंग्लंडची संपूर्ण टीम १२२ धावांवर तंबूत परतली. मार्क वूडशिवाय इंग्लंडच्या एकाही फलंदाजांला २० धावांच्या पुढे धावसंख्या काढता आल्या नाहीत.

या कसोटी सामन्यात भारतासाठी रविंद्र जडेजाने ५ गडी बाद केले. तर कुलदीप यादवने २ गडी बाद केले. तर बुमराह आणि अश्विनने प्रत्येकी एक-एक गडी बाद केले. भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने २-१ ने आघाडी केली आहे. हैदराबादमध्ये इंग्लंडने पहिला कसोटी सामना जिंकला. तर विशाखापट्टणममध्ये टीम इंडियाने दुसरा कसोटी सामना जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold-Silver Price Hike: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता सोनं-चांदी खरेदी करणं आणखी महागणार

Fruit in Summer: उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी फळं कोणती? वाढत्या उकाड्यात नक्की करा आहारात समावेश

Tea Recipe: चहामध्ये साखरेऐवजी 'हा' एक पदार्थ टाका; चवीसोबतच आरोग्यालाही मिळतील 5 जबरदस्त फायदे

Maharashtra News Live Update: अकोल्याला उष्ण लाटेचा इशारा, तापमान ४५ पार

Dombivli : इरशाळवाडीत ट्रेक करताना अचानक काय घडलं? डोंबिवलीच्या २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT