SURYAKUMAR YADAV Saam tv
Sports

IND vs ENG: पहिल्या टी-२० सामन्यासाठी Playing XI ची घोषणा! कर्णधाराबाबत घेतला मोठा निर्णय

England Playing XI For IND vs ENG 1st T20I: भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Ankush Dhavre

कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने २४ तासांपूर्वीच भारतीय संघाच्या प्लेइंग ११ची घोषणा केली आहे. या सामन्यात फिल सॉल्ट आणि बेन डकेट ही जोडी सलामीला फलंदाजी करण्यासाठी मैदानात येणार आहे. तर कर्णधार जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात येणार आहे.

या संघातील गोलंदाजी आक्रमणाबद्दल बोलायचं झालं,तर ,मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर हे वेगवान गोलंदाजी आक्रमणाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहेत. वूड दुखापतीमुळे गेली काही महिने संघाबाहेर होता.

मात्र आता त्याला कमबॅक करण्याची संधी देण्यात आली आहे. यासह हॅरी ब्रुकची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. या सामन्यासाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून, जेमी ओवर्टन , गस एटकिंसन, जेकब बेथेल आणि लियाम लिविंगस्टन यांना संधी देण्यात आली आहे. हे सर्व खेळाडू गोलंदाजीसह फलंदाजीतही योगदान देऊ शकतात. यासह फिरकी गोलंदाज म्हणून आदिल राशिदला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आले आहे.

भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी अशी आहे इंग्लंडची प्लेइंग ११:

बेन डकेट, फिल सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार),हॅरी ब्रूक, लियाम लिविंगस्टन, जेकब बेथेल, जेमी ओवर्टन, गस एटकिंसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.

या मालिकेसाठी असा आहे इंग्लंडचा संघ:

जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस एटकिंसन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओवरटन, जेमी स्मिथ, लियाम लिविंगस्टन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वुड

या मालिकेसाठी असा आहे भारताचा संघ:

सूर्यकुमार यादव (कप्तान), संजू सैमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, नितीश रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, हर्षित राणा, ध्रुव जुरेल, रिंकू सिंह, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, वरुण चक्रवर्ती और वाशिंगटन सुंदर।

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT