Mohmmad Siraj X
Sports

Ind Vs Eng : लॉर्ड्सच्या मैदानात राडा, विकेटनंतरचं सेलिब्रेशन सिराजला महागात पडलं; ICCने केली मोठी कारवाई

Ind Vs Eng 3rd Test : अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यामध्ये विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेट करणं मोहम्मद सिराजला महागात पडलं आहे. याप्रकरणी आयसीसीने सिराजवर मोठी कारवाई केली आहे.

Yash Shirke

Ind Vs Eng तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोहम्मद सिराजवर कारवाई करण्यात आली आहे. सिराजला त्याच्या मॅच फीच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी बेन डकेटच्या विकेटनंतर सेलिब्रेट केल्याबद्दल सिराजला शिक्षा देण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला बेन डकेट आणि झॅक क्रॉली ही इंग्लंडची सलामीची जोडी मैदानात उतरली. बेन डकेटच्या रुपाने भारताला पहिली विकेट मिळाली. मोहम्मद सिराजने बेन डकेटला बाद केले. विकेट घेतल्यानंतर सिराज फॉलो-थ्रूमध्ये बेन डकेटकडे गेला आणि त्याने सेलिब्रेट केले. बेन जेव्हा लाँग रुमकडे चालू लागला, तेव्हा सिराजचा खांदा डकेटच्या खांद्यावर आदळला.

मोहम्मद सिराजने आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन केले आहे. हे कलम आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यादरम्यान फलंदाज बाद झाल्यानंतर भाषा, वर्तन किंवा हातवाऱ्यांचा वापर करुन फलंदाजाचा अपमान करणे किंवा आक्रमक प्रतिक्रिया देणे याच्याशी संबंधित आहे. मॅच फीमधील १५ टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावण्याव्यतिरिक्त सिराजच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडण्यात आला आहे.

मागील २४ महिन्यांमध्ये मोहम्मद सिराजने दुसऱ्यांदा आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्याच्या रेकॉर्डमध्ये सध्या दोन डिमेरिट पॉइंट्स आहेत. जर एखाद्या खेळाडूच्या रेकॉर्डमध्ये २४ महिने म्हणजेच दोन वर्षांच्या कालावधीत चार किंवा त्यापेक्षा जास्त डिमेरिट पॉइंट असतील, तर खेळाडूवर बंदी घातली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधान परिषदेच्या निवडणुकीआधी शिवसेनेत मोठी उलथापालथ; एकनाथ शिंदे पक्षात भाकरी फिरवणार

Shocking : दोन महिन्यांच्या मुलीला आईच्या कुशीतून पळवलं, पालकांना शेतात सापडला मृतदे; नेमकं काय घडलं?

मुंबईत BCCIच्या ब्रॉडकास्ट इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू; IPLसाठी आला होता भारतात|VIDEO

Sunetra Pawar : सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं, आई एकविरा चरणी राष्ट्रवादीच्या आमदाराचं साकडं

8th Pay Commission: २०२६ की २०२७; कधी होणार आठवा वेतन आयोग लागू? केंद्र सरकारने स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT