IND vs ENG, IND vs SL: मालिकांवर कोरोनाचे सावट; सामने होणार ?  Twitter/ @ICC
Sports

IND vs ENG, IND vs SL: मालिकांवर कोरोनाचे सावट; सामने होणार ?

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील IND vs ENG खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

वृत्तसंस्था

कोविड -19 (Coronavirus) चा प्रभाव जगभरात होणार्‍या बर्‍याच क्रिकेट मालिकांवर झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत इंग्लंडला आपला मुख्य संघ विलगीकरणात ठेवावा लागला होता. त्याचवेळी, श्रीलंकेच्या संघाला भारताविरुद्धच्या IND vs SL सामन्या अगोदर विलगिकरणात ठेवण्यात आले होते. यामुळेच सामन्यांचे वेळापत्रक बदलावे लागले होते. भारतीय संघही कोविड-19 च्या धोक्यातून सुटू शकला नाही. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील IND vs ENG खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेला भारतीय संघ कोरोनाच्या सावटाखाली आहे.

इंग्लंड दौर्‍यावर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप WTC 2021 खेळण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात रवाना झाली होती. तेथे 18 ते 23 जून दरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात भारत न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाला. यानंतर 4 ऑगस्टपासून भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध मालिका खेळणार होता. दरम्यानच्या काळात संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने लांबलचक ब्रेक दिला. या दरम्यान, खेळाडू फुटबॉल स्पर्धा युरो चषक, टेनिस स्पर्धा, विम्बल्डन पाहाण्यासाठी गेले होते. आज आलेल्या माहितीनुसार भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत इंग्लंडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

आता प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की पुढे काय होईल? श्रीलंकेत गेलेल्या भारतीय संघाचा प्रश्न आहे कारण त्यांची मालिका 18 जुलैपासून सुरू होणार आहे. यापुर्वी श्रीलंकेचा फलंदाजी प्रशिक्षक ग्रॅट फ्लाॅवर कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला विलगिकरणात ठेवण्यात आले होते. पहिला एकदिवसीय सामना तीन दिवसांनी सुरु होणार आहे. तोपर्यंत सर्व काही ठिक राहिले तर सामना ठरलेल्या दिवशी सुरु होईल.

दुसरीकडे इंग्लंड दौर्‍यावर असलेल्या टीम इंडियाची चिंता वाढली आहे. पंतचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तथापि, त्याची तब्येत सुधारत आहे असे म्हटले जात असले तरी टीम मॅनेजमेंटची चिंता वाढली आहे. 20 जुलैपासून भारताला काउंटी चॅम्पियनशिप इलेव्हन सोबत सराव सामना खेळणार आहे. डरहम क्रिकेट हा सामना होस्ट करीत आहे. आता सर्वात मोठा प्रश्न आहे की त्या सामन्याच्या तारखा पुढे ढकलण्यात येतील की वेळेवर खेळवले जातील? त्यात पंत खेळू शकणार का?.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या चाऱ्याची इतर जिल्ह्यांत वाहतूक करण्यास प्रतिबंध

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

Relationship Tips: सासूबाईंची आवडती सून होण्यासाठी करा 'या' ५ गोष्टी; सासरवाडीत व्हाल सर्वांच्या लाडक्या

Tuesday Horoscope: संपत्तीत वाढ होणार! ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

SCROLL FOR NEXT