team india twitter
Sports

IND vs ENG 5th T20I: अंतिम टी-२० सामन्यासाठी भारताची प्लेइंग ११ ठरली? या ११ खेळाडूंना मिळू शकते संधी

India vs England 5th T20I Playing XI Prediction: भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

Ankush Dhavre

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना रंगणार आहे. या मालिकेत भारतीय संघ ३-१ ने आघाडीवर आहे. मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने शानदार कमबॅक केलं.

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेटच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवून मालिकेवर ३-१ कब्जा केला. दरम्यान शेवटचा सामना जिंकून भारतीय संघ ४-१ ने ट्रॉफी उंचावण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

कोणाला संधी मिळणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरुवातीच्या चारही सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे पाचव्या सामन्यातही प्लेइंग ११ मध्ये बदल होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. प्लेइंग ११ मध्ये कोणाला संधी द्यावी? या प्रश्नामुळे सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर यांची डोकेदुखी वाढणार यात काहीच शंका नाही.

या सामन्यात मोहम्मद शमीला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणं जवळजवळ निश्चित मानलं जात आहे. यापूर्वी मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी त्याला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली गेली होती. मात्र त्याला ३ षटकात एकही गडी बाद करता आला नव्हता.

संघात २ बदल निश्चित?

भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने या संपूर्ण मालिकेत शानदार गोलंदाजी केली आहे. त्याला या सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. कारण भारतीय संघाला ही मालिका झाल्यानंतर इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका आणि दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळायची आहे. त्याच्या जागी मोहम्मद शमीला संधी दिली जाऊ शकते. तर हर्षित राणाचाही प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, हर्षित राणा, रवि बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT