Shubman Gill Video x
Sports

Ind Vs Eng : शुभमन गिल थेट अंपायर्संना भिडला, एका चेंडूवरुन मोठा राडा; लॉर्ड्सच्या मैदानात काय घडलं?

Shubman Gill Video : सध्या लॉर्ड्सच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार शुभमन गिलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय संघाचा अंपायर्सशी वाद झाल्याचे पाहायला मिळाले. भारताचा युवा कर्णधार शुभमन गिल चेंडूबाबत अंपायर्सच्या निर्णयावर नाराज असल्याचे पाहायला मिळाले. शुभमन गिल व्यतिरिक्त मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा यांनीही अंपायर्सच्या निर्णयावर असहमती दर्शवल्याचे पाहायला मिळाले.

दुसऱ्या दिवशी ९१ व्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. त्याने चेंडूच्या आकारात बदल झाल्याचे म्हणत अंपायर्सकडे तक्रार केली. अंपायर सैकत शराफुद्दौला यांनी चेंडू तपासला. चेंडूचा आकार बदलल्याचे समोर आल्यानंतर तो बदलण्यात आला. चेंडूंनी भरलेल्या बॉक्समधून अंपायर्सनी नवा चेंडू बाहेर काढला. पण हा चेंडू शुभमन गिलला योग्य वाटला नाही. त्याने यावर आक्षेप नोंदवला.

अंपायर्सनी दिलेला चेंडू १०-११ ओव्हर्सपेक्षा जास्त जुना आहे, असे शुभमन गिलने म्हटले. जेव्हा सामन्यादरम्यान चेंडू बदलला जातो, त्यावेळेस मूळ चेंडूसारखा जुना चेंडू देणे अपेक्षित असते. पण अंपायर्सनी गिलचे म्हणणे फेटाळले. तेव्हा शुबमन गिलने रागात चेंडू दाखवत अंपायर्सशी वाद घातला. अंपायर्सनी गिलकडे लक्ष न देता सामना सुरु करण्यास सांगितले.

मोहम्मद सिराज आणि आकाश दीपने ही चेंडूच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित केले. सिराजने अंपायरकडे जाऊन 'हा चेंडू जास्त जुना दिसतोय' असे म्हटले. पण अंपायर्सनी सिराजला खेळ सुरु करण्यास सांगितले. कॉमेट्री बॉक्समध्ये बसलेल्या सुनील गावस्कर यांनीही यावर आक्षेप घेतला. दिलेला चेंडू २० ओव्हर्सइतका जुना वाटतोय, असे गावस्कर म्हणाले. सरतेशेवटी अंपायर्सनी चेंडू बदलून दिला आणि खेळ सुरु झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT