Ind Vs Eng 3rd Test x
Sports

Ind Vs Eng : शुभमन गिल-गौतम गंभीरची 'ती' चूक भारताला महागात पडणार? टीम इंडिया लॉर्ड्स कसोटी गमावणार?

Ind Vs Eng 3rd Test : लॉर्ड्सच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना सुरु आहे. आज सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. भारतासमोर १९३ धावांचे लक्ष्य आहे.

Yash Shirke

Ind Vs Eng Lords Test :भारत विरुद्ध इंग्लंड लॉर्ड्स कसोटी रोमांचक आणि निर्णायक टप्प्यावर आहे. विजयासाठी भारताला १९३ धावांचे लक्ष्य मिळाले होते. आतापर्यंत (४५ व्या ओव्हरपर्यंत) भारताने ८ विकेट्स गमावल्या आहेत. दिवसाच्या सुरुवातीला लागोपाठ ३ भारतीय खेळाडू बाद झाले. यादरम्यान भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये बसेलले कर्णधार शुभमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडून मोठी चूक झाल्याचे म्हटले जात आहे.

गिल आणि गंभीरकडून कोणती चूक झाली?

ज्यावेळेस केएल राहुल बाद झाला, तेव्हा फलंदाजीक्रमानुसार नितीशकुमार रेड्डी खेळायला येणं अपेक्षित होते. पण त्याच्याजागी वॉशिंग्टन सुंदरला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. जर नितीशकुमार रेड्डी त्यावेळेस खेळण्यासाठी आला असता, तर उजव्या आणि डावखुऱ्या फलंदाजीमुळे इंग्लंडच्या गोलंदाजांची लय बिघडू शकली असती. पण रेड्डीच्या ऐवजी वॉशिंग्टन सुंदरला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

केएल राहुल बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीला आला. लगेच दुसऱ्या ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरने सुंदरला कॅचआउट केले. एकही धाव न करता वॉशिंग्टन सुंदर माघारी परतला. त्यानंतर नितीश कुमार रेड्डी आला, रेड्डीने रवींद्र जडेजाला उत्तमरित्या साथ दिली. दोघांनी चांगली भागीदारी केली. पण पहिल्या सत्राच्या आधी नितीश कुमार रेड्डीची विकेट पडली.

लॉर्ड्सच्या कसोटीत पहिल्या डावात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ३८७ धावा केल्या. त्यानंतर भारताचा संघ देखील ३८७ धावांवर ऑलआउट झाला. त्यानंतर भारताने १९२ धावांवर इंग्लंडला रोखले. चौथ्या दिवसाच्या शेवटी भारताने ४ विकेट्स गमावल्या. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला इंग्लंडने भारताचे ४ गडी बाद केले. लॉर्ड्सच्या खेळपट्टीचा फायदा इंग्लंडच्या गोलंदाजांना मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT