Akash Deep Ind Vs Eng x
Sports

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Akash Deep : भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात आकाश दीपला भारताने संधी दिली. त्याने दोन्ही डावांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने चार विकेट्स घेतल्या.

Yash Shirke

Ind Vs Eng : बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना सुरु आहे. आज या सामन्यातील पाचवा आणि निर्णायक दिवस आहे. पाचव्या दिवसातील पहिल्या सत्राला सुरुवात झाली आहे. पहिल्या सत्रात आकाश दीपने कमाल केली आहे. त्याने दोन ओव्हर्समध्ये लागोपाठ दोन विकेट्स घेतल्या आहेत.

पाचव्या दिवसातील पहिल्या सत्राला सुरुवात झाली, तेव्हा इंग्लंडची धावसंख्या ७२ धावा आणि ३ विकेट्स अशी होती. सामन्याला सुरुवात झाल्यानंतर ऑली पोप आणि हॅरी ब्रूक हे दोघे मैदानात फलंदाजी करण्यासाठी उतरले. पहिल्या सत्रात २० व्या ओव्हरमध्ये आकाश दीप गोलंदाजी करण्यासाठी आला. या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर ऑली पोप बोल्ट झाला. त्यानंतर २२ व्या ओव्हरमध्ये आकाश दीपने हॅरी ब्रूकला एलबीडब्लू आउट केले. फक्त दोन ओव्हर्समध्ये आकाश दीपने दोन महत्त्वाच्या फलंदाजांना माघारी पाठवले.

एजबॅस्टन कसोटी सामन्यामध्ये आकाश दीपला संधी देण्याबाबत अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये आकाश दीपला संधी का देण्यात आली असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. या प्रश्नांना, होणाऱ्या चर्चांना आकाश दीपने त्याच्या गोलंदाजीने, खेळाने उत्तर दिले आहे. सामन्यामध्ये त्याने पहिल्या डावात ४ विकेट्स घेतल्या. आता दुसऱ्या डावात पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रापर्यंत आकाश दीपने ४ गडी बाद केले आहेत.

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने इंग्लंडला ६०८ धावांचे आव्हान दिले. चौथ्या दिवसाच्या शेवटपर्यंत भारताने इंग्लंडचे तीन गडी बाद केले. त्यानंतर पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात दोन विकेट्स मिळाल्या. या पाच विकेट्सपैकी चार विकेट्स आकाश दीपने घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

Indian Railway Food: ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात कोणते पीठ आणि तांदूळ वापरले जाते? जाणून घ्या

Bigg Boss 20: बिग बॉस २०मध्ये मोठा ट्विस्ट; ११ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, फक्त ३ सदस्य सेफ

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्त्याचा पोलिसांत सर्वात मोठा दावा, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT