gautam gambhir twitter
Sports

IND vs ENG 1st ODI: टीम इंडियात भाकरी फिरणार? सामन्यानंतर गंभीरने रोहितला झापलं, पाहा VIDEO

Rohit Shrma -Gautam Gambhir Viral Video: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यानंतर गौतम गंभीर आणि रोहित शर्माचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. ऑस्ट्रेलियात ५ डावात फलंदाजी करताना त्याला अवघ्या २९ धावा करता आल्या होत्या.

जर्सीची रंग बदलल्यानंतर रोहितचा फॉर्म बदलू शकतो, असं म्हटलं जात होतं. मात्र कसोटी पाठोपाठ वनडेतही रोहित शर्माचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत रोहित अवघ्या २ धावा करत माघारी परतला. दरम्यान या सामन्यानंतर रोहित शर्मा आणि गौतम गंभीरचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

कसोटी पाठोपाठ वनडेतही रोहितचा फ्लॉप शो

भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना ४ गडी राखून जिंकला आहे. मात्र रोहित शर्माची बॅट या सामन्यातही शांतच राहिली. या सामन्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरली.

यशस्वीने काही चौकार खेचले, पण तो अवघ्या १५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर रोहितनेही अवघ्या २ धावांवर पॅव्हेलियनची वाट धरली. फॅन्स रोहित फॉर्ममध्ये परतण्याची वाट पाहत आहेत. मात्र तो बाद होताच मैदानात शुकशुकाट पाहायला मिळाला.

रोहित शर्मा- गौतम गंभीरचं नेमकं काय सुरुये?

पहिला वनडे सामना झाल्यानंतर, रोहित शर्मा आणि गौतम गंभीरचा एक फोटो व्हायरल होऊ लागला आहे. ज्यात दोघेही चर्चा करताना दिसून येत आहेत. यादरम्यान रोहित शर्मा गौतम गंभीरला काहीतरी समजवताना दिसून येत आहे. दरम्यान हा फोटो व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. काहींच्या मते, गंभीर रोहितच्या फलंदाजीबाबत चर्चा करताना दिसून येत आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी ठरणार शेवटची संधी?

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेली वनडे मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. कारण ही मालिका झाल्यानंतर १९ फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत तरी रोहितची बॅट चालणं गरजेचं असणार आहे. जर या स्पर्धेतही तो फ्लॉप ठरला, तर त्याच्याकडे निवृ्त्ती घेण्याशिवाय पर्याय नसेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT