Ind vs Ban, Ishan Kishan : भारत आणि बांग्लादेश यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ईशान किशनच्या तुफानी फलंदाजीसमोर बांगलादेशच्या गोलंदाजांनी नांगी टाकली. या सामन्यात तुफान फटकेबाजी करत ईशान किशनने वनडेतील त्याचे पहिले द्विशतक ठोकले आहे.
अवघ्या ८५ चेंडूत त्याने आपले शतक पूर्ण केले. बांगलादेशी गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत ईशानने अवघ्या १२६ चेंडूत २०० धावांची वादळी खेळी केली. या खेळीसोबतच ईशान किशनने वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचाही विक्रम मोडला आहे.
भारत आणि बांग्लादेश यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ईशान किशनने शानदार द्विशतक झळकावले. ईशानच्या या स्फोटक खेळीमध्ये २४ चौकार आणि १० षटकार मारले. या वादळी खेळीसोबतच ईशान किशनने ख्रिस गेलचा सर्वात जलद द्विशतक करण्याचा विक्रमही मोडला आहे. (Ishan Kishan)
ईशान किशनने अवघ्या १२६ चेंडूत द्विशतक साजरे करत ख्रिस गेलचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. या वादळी खेळीसोबतच तो एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकवणारा चौथा भारतीय, तर जगातील नववा फलंदाज बनला आहे. ईशान किशनच्या आधी सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनी द्विशतके झळकावली आहेत. ज्यामध्ये रोहित शर्माने सर्वाधिक तीन वेळा हा पराक्रम केला आहे. (Cricket News)
दरम्यान, बांग्लादेश विरुद्धच्या या सामन्यात ईशान किशनच्या वादळी द्विशतकासोबतच विराट कोहलीनेही शानदार शतक झळकावले. विराटचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७२ वे शतक ठरले. या खेळीमध्ये विराटने ११ चौकार व एक षटकार लगावला. ईशान आणि विराट कोहलीच्या या स्फोटक खेळीच्या जोरावर भारताने या सामन्यात ४०९ धावांचा डोंगर उभा केला.
Edited By - Gangappa Pujari
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.