IND vs AUS Test Series Saam TV
Sports

IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; मॅचविनर खेळाडू टीमबाहेर!

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

Satish Daud

IND vs AUS Test Series : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू जखमी झाला आहे. पाठीचा त्रास जाणवत असल्याने डॉक्टरांनी त्याला दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. (Latest Marathi News)

भारत  (Team India) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार असून या मालिकेचा पहिला सामना ९ फेब्रुवारीला नागपुरात रंगणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच टीम इंडियाच्या मधल्या फळीचा फलंदाज श्रेयस अय्यर याला पाठीच्या दुखण्याचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे श्रेयस पहिला कसोटी सामना खेळणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

याच दुखापतीमुळे श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरूद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे सिरीजमधून बाहेर पडला होता. सध्या त्याला 2 आठवडे आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशातच त्याच्या जागी टी-20 मध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला पदार्पण करण्याची संधी दिली जाणार आहे.

नुकतीच भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या ४ सामन्यांच्या सिरीजसाठी पहिल्या २ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.  टीम इंडियाकडून (Team India) सूर्यकुमार यादवला स्थान देण्यात आलं आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सूर्याची कामगिरी बघता निवड समितीने त्यावर विश्वास दाखवला आहे.

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या एका अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, श्रेयस अय्यरची दुखापत अजूनही बरी झालेली नाही. त्यामुळे त्याला २ आठवड्यांच्या आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे तो मैदानात कधी कमबॅक करणार यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाला २००४-०५ नंतर भारतात कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. २००५ नंतर ऑस्ट्रेलियाने भारतीय खेळपट्टींवर सलग तीन कसोटी मालिका गमावल्या आहेत आणि यंदा ही मालिका खंडित करण्याचा त्यांचा निर्धार आहे. भारतात होणाऱ्या या कसोटी मालिकेसाठी फिरकीपटूंना साथ देणारी खेळपट्टी असेल, याची जाण ऑस्ट्रेलियाला आहे. त्यामुळेच त्यांनीही संघात फिरकी गोलंदाजांची निवड केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Latest Updates: गॅस टंचाईदरम्यान LPG, CNG आणि PNG बाबत सरकारचा मोठा निर्णय

Jowar Chakli Sticks: झणझणीत ज्वारी स्टिक्स रेसिपी, घरच्या घरी करा हेल्दी स्नॅक्स

पानसरेंच्या पुस्तकावरून वाद, कार्यकर्त्यांची धरपकड; संजय गायकवाडांची मुजोरी कायम

मराठी सक्तीवरून सरनाईकांचं नवं कोडं; १ मेपासून मराठी सक्ती, मात्र कारवाई नाही

Maharashtra News Live Update: दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी काढण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा जलयात्रेचे धुळ्यात जल्लोषात स्वागत

SCROLL FOR NEXT