Ind Vs Aus Saam Tv
Sports

Ind Vs Aus : कुलदीप यादवने भर सामन्यात असं काही केलं की विराट-रोहित संतापले, व्हिडिओ होतोय व्हायरल

Ind vs Aus Semi Final : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात कुलदीप यादवला एका चुकीसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून ओरडा पडला. कुलदीपने नेमकं काय केलं? पाहा व्हिडीओ..

Yash Shirke

Ind vs Aus Match : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला उपांत्य फेरीतील सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु आहे. सामन्यात टॉस जिंकून ऑस्ट्रलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ५० षटकामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने २६४ धावा केल्या. दरम्यान सामन्याच्या ३२ व्या षटकामध्ये एका चुकीमुळे फिरकीपटू कुलदीप यादवला ओरडा पडला.

कुलदीप यादव हा ३२ वे षटकात गोलंदाजी करत होता. त्या दरम्यान कुलदीपने टाकलेल्या चेंडूवर स्टीव स्मिथने मिड विकेटच्या दिशेने जोरदार शॉट मारला. तेथे उभ्या असलेल्या विराट कोहलीने चेंडू पकडला आणि विकेटच्या दिशेने जोरात फेकला. स्वत:कडे येणारा चेंडू कुलदीपने सोडला. पुढे चेंडू कव्हर्सवर उभ्या असलेल्या रोहित शर्माकडे गेली.

कुलदीपने चेंडू न पकडल्याने विराट कोहलीला खूप राग आला. त्यानंतर रोहित शर्मानेही कुलदीप यादवला उद्देशून उद्गार काढले. ही घटना स्टेडियममधील कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. व्हिडीओमध्ये चेंडू सोडल्याने रागात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या तोंडून अपशब्द निघाल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधला आजचा उपांत्य फेरीतील सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे. आजचा सामना जो संघ जिंकेल तो अंतिम सामना खेळेल. दरम्यान या सामन्यामध्ये भारताचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. पण तरीही ऑस्ट्रेलिया सामन्यात कधीही कमबॅक करु शकते असे चाहते म्हणत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT