Ind vs Aus Match Saam Tv
Sports

Ind Vs Aus : तुम्ही गप्पा मारा.. कोहली-राहुलच्या सूचना ऐकून जडेजा वैतागला, व्हिडिओ व्हायरल

Ind vs Aus Match : चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना सुरु आहे. सामन्यात ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना एक गमतीदार घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

Ind Vs Aus Semi Final : चॅम्पियन्स ट्रॉफीतला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सेमीफायनलचा सामना सुरु आहे. या सामन्यात टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी असताना एक गमतीशीर घटना घडली. केएल राहुल, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांचे संभाषण स्टम्प माइकमध्ये कैद झाले.

मार्नस लाबुशेन फलंदाजी करत होता. तर रविंद्र जडेजा हा गोलंदाजी करत होता. याचदरम्यान स्मिथ आणि लाबुशेन यांनी चांगली भागीदारी केली होती. तेव्हा लाबुशेनची विकेट पाडण्यासाठी जडेजा प्रयत्न करत होता. तेव्हा केएल राहुल रविंद्र जडेजाला गाईड करु लागला. त्यात विराटनेही विकेट कशी पडेल यासाठी जडेजाला सूचना देत होता.

केएल राहुल म्हणाला, 'नाही जात आहे रे.. एक बॉल फिरव आता फक्त..' विराट म्हणाला, 'तीन बॉल उरलेत आता फक्त..' विराट आणि राहुलच्या सूचना ऐकून जडेजा थोडा वैतागला आणि म्हणाला, 'तुम्ही दोघे गप्पा मारा मी तोपर्यंत ३ बॉल टाकून घेतो.' हा गंमतीचा संवाद तेथील स्टम्प माईकमध्ये कैद झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माजी क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय संघाने आज हाताला काळी पट्टी बांधली. काल (३ मार्च) पद्माकर शिवलकर यांचे निधन झाले. शिवलकर मुंबईकडून रणजीसह अनेक स्पर्धांमध्ये खेळले होते. १९६१-६२ पासून १९८७-८८ पर्यंतच्या काळात १२४ सामन्यात शिवलकर यांचा सहभाग होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Post Offer: शंभर आमदार आणा अन् मुख्यमंत्री व्हा! दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सीएम पदाची ऑफर

Maharashtra Live News Update: कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मृत महिलेचा आढळला

Viral Video: इच्छा असेल तर...; विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेवर चिकटवली २०० रुपयांची नोट, लिहिलेली शायरी वाचून पोट धरून हसाल

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

SCROLL FOR NEXT