jasprit bumrah twitter
Sports

IND vs AUS: 19 वर्षांचा पोरगा बुमराहवर पडला भारी! १११२ दिवसांनंतर पहिल्यांदाच असं घडलं

Sam Contas vs Jasprit Bumrah: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये सुरु आहे. या सामन्यात सँम काँटास जसप्रीत बुमराहवर भारी पडल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर सुरू आहे. ही मालिका १-१ ने बरोबरीत आहे. त्यामुळे मालिकेतील चौथा कसोटी सामना हा दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षीय फलंदाज सॅम काँटासला पदार्पणाची संधी दिली आहे. दरम्यान पहिल्याच डावात त्याने असा काही कारनामा करून दाखवला आहे, जो गेल्या काही वर्षांत कोणालाच जमला नव्हता.

१११२ दिवसांनंतर मोडला रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजीला आलेल्या, सॅम काँटासने ३ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. या १९ वर्षीय फलंदाजाने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर फलंदाजी करताना रिव्हर्स रॅम्प शॉट खेळून १ षटकार आणि २ चौकार खेचले.

बुमराह असा एकमेव गोलंदाज असावा जो गेल्या ३ वर्षांपासून सातत्याने कसोटी क्रिकेट खेळतोय, मात्र त्याच्या गोलंदाजीवर कुठल्याही फलंदाजाने एकही षटकार खेचला नव्हता. मात्र आता सॅम काँटासने १११२ दिवसांनंतर आणि ४४८३ चेंडू. टाकल्यानंतर बुमराहच्या गोलंदाजीवर षटकार मारला आहे.

सॅम काँटासला पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात खेळण्याची संधी मिळाली आहे. यासह तो ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी २०२१ मध्ये कॅमरून ग्रीनने त्याच्याविरुध्द फलंदाजी करताना षटकार खेचला होता.

सॅम काँटासबद्दल बोलायचं झालं तर ,त्याने डावातील २३ व्या षटकात या शानदार षटकार खेचला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजांनी तगडं आव्हान दिलं. सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी त्याला बाद करण्याची संधी निर्माण करून दिली. मात्र त्याला नशिबाने साथ दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT