Rohit Sharma and Virat Kohli’s early dismissals spark meme fest on social media; fans express frustration with humor. saam tv
Sports

IND vs AUS: रविवार असूनही सकाळी लवकर उठलो, पण...; ८ आणि ० वर बाद होणाऱ्या रोहित-विराटचे मीम्स व्हायरल

IND vs AUS Rohit Sharma and Virat Kohli Memes : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा ० आणि विराट कोहली ८ धावांवर बाद झाल्याने टीम इंडिया निराशाजनक ठरली. सुरुवातीच्या पराभवावर चाहत्यांनी सोशल मीडियावर विनोदी मीम्सचा वर्षाव झाला.

Bharat Jadhav

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात रोहित शर्मा ० आणि विराट कोहली ८ धावांवर बाद

  • सोशल मीडियावर मीम्स शेअर

  • रोहित-विराटच्या अपयशामुळे भारतीय संघाचा डाव गडगडला.

किक्रेट प्रेमींसाठी आजचा दिवस खूप निराशाजनक राहिला. आशिया कपमध्ये धमाकेदार विजय मिळवणारा टीम इंडिया मोठ्या आत्मविश्वासाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलाय. पण एकदिवशीय मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाचं पानीपत झालं.

पर्थ स्टेडियमवर होणाऱ्या भारतविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात भारतीय संघाची घसरगुंडी झाली. कर्णधार शुबमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या निराशाजनक कामगिरीवर क्रिकेट रसिक नाराज झालेत. मोठी धावसंख्या न करता तंबूत परतणाऱ्या विराट कोहली आणि रोहित शर्माला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजला आणि पाकिस्तानला पराभूत करत ९ व्यावेळी आशिया कप जिंकणारा भारतीय संघ आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. येथे तीन एकदिवशी सामन्यांची मालिका दोन्ही देशातील संघ खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज पार्थ स्टेडियमवर होत आहे.

भारतीय वेळीनुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना हा सकाळी ९ वाजता सुरू झाला. दरम्यान या सामन्यांसाठी भारतीय संघात विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे क्रिकेट रसिक ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यात आज रविवारी पहिला सामना होतोय.

भारतीय वेळेनुसार, सकाळी ९ वाजता हा सामना सुरू झाला. तसं पाहिलं तर रविवार हा सुट्टीचा दिवस. सुट्टीच्या दिवशी बहुतेकजण उशिराने उठतात. आज भारत ऑस्ट्रेलियाचा सामना असल्यानं क्रिकेट रसिक लवकर उठले. त्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा खेळ पाहणं हे रसिकांसाठी पर्वणी होती. पण काहीच वेळात त्यांचा भ्रमनिरास झाला.

फराळ आणि चहाचा आस्वाद घेत क्रिकेट रसिक भारत-ऑस्ट्रेलियाचा सामना पाहू लागले. पण विराट आणि रोहितचा खराब खेळ पाहून चाहते नाराज झालेत. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करू लागले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय फलंदाजांची सुरुवात चांगली झाली नाही. विराट कोहली, रोहित शर्मा आणि नवीन कर्णधार शुबमन गिल यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु तिघांनीही निराशा केली. पर्थमधील एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात, टीम इंडियाचा टॉप ऑर्डर इतका खराब झाला की त्याने आपल्याला ६ वर्षांपूर्वीच्या सामन्याची आठवण करून दिली.

टीम इंडियाने अवघ्या २५ धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. याची सुरुवात रोहित शर्मापासून झाली. रोहित सात महिन्यानंतर मैदानावर उतरला होता. परंतु त्याचे पुनरामन चांगले राहिले नाही. तो फक्त ८ धावा बनवू शकला. विराट कोहलीनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. कोहलीनेही चाहत्यांना निराश केले. चाहत्यांना कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु या स्टार फलंदाजाला या सामन्यात आपले खातेही उघडता आले नाही. तो फक्त ० धावांवर बाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BSNL चा धमाका! अनलिमिटेड कॉलिंग अन् १०० जीबी डेटा; विद्यार्थांसाठी आणला नवा प्लॅन

Shocking : क्षणात सर्व काही संपलं! सौदी अरेबियातील भीषण अपघात एकाच कुटुंबातील १८ लोकांचा मृत्यू

Income Tax Refund: करदात्यांसाठी बातमी, कर परतावा कधी मिळणार, आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Politics: चंद्रपुरात भाजपसोबत मोठा गेम,४ नगरपरिषदांमध्ये पक्षात्तर करत थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधातच बंडखोरी

Supreme Court :...तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करू; निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचा सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT