travis head twitter
Sports

IND vs AUS: बॅटिंगनंतर आता बॉलिंगमध्येही हेड नडला! पंतची विकेट ते आगळं वेगळं सेलिब्रेशन का केलं? जाणून घ्या कारण

Travis Head Celebration After Taking Wicket Of Rishabh Pant: फलंदाजीत नडणारा हेड आता गोलंदाजीतही नडला. पण त्या सेलिब्रेशनचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या.

Ankush Dhavre

मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी ३४० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला सुरुवातीला ३ मोठे धक्के बसले. रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतले.

त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंतने मिळून संघाचा डाव सांभाळला. मात्र ट्रेविस हेडने पंतला बाद करत माघारी धाडलं. दरम्यान त्याला बाद करताच ट्रेविस हेडने असं काही सेलिब्रेशन करताना दिसून आला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

ट्रेविस हेड भारतीय गोलंदाजांना नेहमीच नडतो. गेल्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी त्याला शांत ठेवलं. फलंदाजीत शांत ठेवल्यानंतर आता गोलंदाजीत तो भारतीय संघाला नडला आहे.

शेवटच्या सत्रात कमिन्सने फिरकी गोलंदाजांना आक्रमणासाठी आणलं. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि ट्रेविस हेड गोलंदाजीला आले. या दोघांनी रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वालची जोडी फोडली.

हेडचं हटके सेलिब्रेशन

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वालची जोडी मैदानावर होती. त्यावेळी हेड गोलंदाजीला आला. हेडने टाकलेल्या चेंडूवर रिषभ पंतने लेग साईडच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.

या प्रयत्नात तो झेलबाद होऊन माघारी परतला. मिचेल मार्शने बाऊंड्री लाईनवर शानदार झेल घेतला. दरम्यान रिषभ पंतला बाद केल्यानंतर हेड हटके सेलिब्रेशन करताना दिसून आला होता. आता त्याचं कारण समोर आलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हेडने हे सेलिब्रेशन का केलं? हे समजावून सांगण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो बर्फाने भरलेल्या ग्लासमध्ये बोट टाकून उभा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: १४.३% वाढ की १४०% पगारवाढ? ₹६९ हजार पगाराचा आकडा चर्चेत कसा आला? जाणून घ्या...

Maharashtra News Live Update: CJP नेते सौरव दास आणि आशुतोष रांका प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचा सवाल; तातडीच्या सुनावणीवर प्रश्नचिन्ह

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT