IND vs AUS ODI Series  Saam TV
Sports

IND vs AUS ODI : भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात मोठे बदल; ३ तगड्या खेळाडूंची वापसी

IND Vs AUS Squad: भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

Satish Daud

IND vs AUS ODI Series : बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला. सलग दोन पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचं भारतात येऊन बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं. हा पराभव ऑस्ट्रेलियाच्या चांगलाच जिव्हारी लागला असून आता भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. (Latest Sports Updates)

वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करताना १६ सदस्यीय संघाचं कर्णधारपद पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आलं आहे. या मालिकेसाठी काही स्टार खेळाडूंचं संघात पुनरागमन झालं आहे. त्यामध्ये ग्लेन मॅक्सवेलचाही समावेश आहे. त्यासोबत झाय रिचर्डसन आणि मिचेल मार्श हेही संघात परतले आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia)  यांच्यातील वनडे मालिकेची सुरुवात ही १७ मार्चपासून होणार आहे. जोश हेझलवूड दुखापतीमुळे या मालिकेत खेळणार नाही. ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श आणि जाय रिचर्ड्सन हे तिन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाचे टॉप प्लेयर आहेत.  (Latest Marathi News)

व्हाइट बॉल म्हणजे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये हे तिन्ही मॅच विनर प्लेयर्स आहेत. या तिघांशिवाय ऑस्ट्रेलियाची बाजू कमकुवत दिसत होती. दुखापतीमुळे हे तिन्ही प्लेयर्स ऑस्ट्रेलियन टीममध्ये नव्हते. आता फिट होऊन हे तिन्ही प्लेयर्स टीममध्ये परतले आहेत.

एकदिवसीय मालिकेसाठीचा ऑस्ट्रेलियन संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), सीन अ‍ॅबॉट, अ‍ॅस्टन अ‍ॅगर, अ‍ॅलेक्स कॅरी, कॅमरून ग्रीन, ट्रॅविस हेड, जोश इंगलिस, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झाम्पा.

ऑस्ट्रेलियाचे भारत दौऱ्यातील उर्वरित सामने

तिसरा कसोटी सामना १ ते ५ मार्च (इंदूर)

चौथा कसोटी सामना ९ ते १३ मार्च (अहमदाबाद)

पहिला एकदिवसीय सामना १७ मार्च (मुंबई)

दुसरा एकदिवसीय सामना १९ मार्च (विशाखापट्टणम)

तिसरा एकदिवसीय सामना २२ मार्च (चेन्नई)

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

Gavar Side Effects : गवार खाणं 'या' लोकांसाठी ठरू शकत धोकादायक! 'ही' ६ कारणे वेळीच घ्या जाणून

SCROLL FOR NEXT