virat kohli twitter
Sports

IND vs AUS: 'बॉक्सिंग डे'साठी भारताचा कसून सराव! चौथ्या सामन्याला केव्हा होणार सुरुवात?

India vs Australia 4th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याला केव्हा सुरुवात होणार?

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघामध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील आतापर्यंत ३ कसोटी सामने खेळले गेले आहेत. ही मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे. तर मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये रंगणार आहे. या सामन्याला येत्या २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ५ वाजता सुरू होईल.

हा सामना बॉक्सिंग डे सामना असणार आहे. भारतीय संघाचा रेकॉर्ड पाहिला तर गेल्या १२ वर्षात भारताने एकही बॉक्सिंग डे कसोटी सामना गमावलेला नाही. त्यामुळे यावेळी भारतीय संघ हा रेकॉर्ड कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

मेलबर्न कसोटी सामना हा भारतीय संघातील प्रमुख फलंदाजांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्मा पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. तर विराटने पहिल्या सामन्यात शतक झळकावलं, पण पुढील दोन्ही सामन्यांमध्ये तो स्वस्तात माघारी परतला.

पर्थमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटीत विराटने शानदार शतकी खेळी केली होती. त्यानंतर पुढील कसोटीत त्याला ७ आणि ११ धावा करता आल्या. तर मालिकेतील तिसऱ्या सामन्यात तो पूर्णपणे फ्लॉप ठरला.

या सामन्यात त्याला अवघ्या ३ धावा करता आल्या. तर दुसरीकडे कर्णधार रोहितला ३ डावात अवघ्या १९ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे मेलबर्न कसोटीत या दोन्ही दिग्गज फलंदाजांची खरी कसोटी लागणार आहे. आता पुढील सामन्यात हे फलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मालिका १-१ ने बरोबरीत

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली कसोटी मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये पार पडला होता. या सामन्यात भारताने २९५ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला १० गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. आता गाबाच्या मैदानावर झालेला सामना हा ड्रॉ राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : घरात पंख्यावर खूपच धुळ बसली? मग 'या' सिंपल ट्रिक्सने करा स्वच्छ

White Sesame Seeds Benefits: थंडीत रोज सकाळी एक चमचा सफेद तीळ खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Live News Update: निवडणूक आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर एक्साईज विभागाची धडक कारवाई, ७० लाखांचा बेकायदेशीर दारू साठा जप्त

Vitamin B12: हाता-पायाला सतत मुंग्या येतात? असू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता, आताच करा आहारात 'हा' बदल

Ankita Walawalkar: 'स्पायवर मस्करी करून रिल बनवणं...'; अंकिता वालावलकर धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवर संतापली, म्हणाली...

SCROLL FOR NEXT