nitish reddy twitter
Sports

Nitish Reddy Century: एकटा नडला, एकटा भिडला! २१ वर्षांच्या पोरानं मेलबर्नवर शतक ठोकलं

IND vs AUS 4th Test, Nitish Kumar Reddy Century: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात नितीश कुमार रेड्डीने शानदार शतकी खेळी केली आहे.

Ankush Dhavre

बॉर्डर गावसकर ट्रॉफीत भारतीय संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापडला, तेव्हा नितीश कुमार रेड्डी खंबीरपणे उभा राहिला. आपली पहिलीच कसोटी मालिका खेळत असलेल्या नितीश कुमार रेड्डीने मालिकेत आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावलं नव्हतं, मात्र त्याने ४२, ४२ धावांची बहुमूल्य खेळी केली होती.

आता मेलबर्नच्या मैदानात भारतीय संघ बॅकफूटवर असताना त्याने शानदार शतकी खेळी केली. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे. यासह त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

नितीश कुमार रेड्डी ज्यावेळी फलंदाजील आला त्यावेळी भारतीय संघाचा डाव फसलेला होता. त्याने रविंद्र जडेजासोबत मिळून ३० धावांची भागीदारी केली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर मैदानात आला. दोघांनी मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला.

या जोडीने ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेट खेळताना ८ व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. नितीश कुमार रेड्डीने आपलं शतक पूर्ण केलं, तर वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतकी खेळी केली.

नितीश कुमार रेड्डीचं शानदार शतक

आपल्या कसोटी कारकिर्दीतील चौथा सामना खेळत असलेल्या नितीश कुमार रेड्डीने संयमी खेळी करत १७६ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिलंच शतक ठरलं आहे. या शतकी खेळीसह तो ऑस्ट्रेलियात आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतकी खेळी करणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.

यापूर्वी कुठल्याही भारतीय फलंदाजाला असा कारनामा करता आला नव्हता. दरम्यान त्याच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. तो ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना शतकी खेळी करणारा तिसरा सर्वात युवा भारतीय फलंदाद ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.

सचिनने १९९२ मध्ये सिडनीच्या मैदानावर वयाच्या १८ व्या वर्षी (१८ वर्ष, २५३ दिवस) शतकी खेळी केली होती. आता नितीश कुमार रेड्डीने हा कारनामा वयाच्या २१ वर्षी करुन दाखवला आहे.

ऑस्ट्रेलियात फलंदाजी करताना शतकी खेळी करणारे युवा भारतीय फलंदाज:

सचिन तेंडुलकर, सिडनी १९९२

१८ वर्ष, २५३ दिवस

रिषभ पंत - सिडनी, २०१९

२१ वर्ष, ९१ दिवस

नितीश कुमार रेड्डी, मेलबर्न, २०२४

२१ वर्ष, २१७ दिवस

दत्तू फडकर, अॅडलेड १९४८

२२ वर्ष, ४२ दिवस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bluetooth Security: ब्लूटूथ हेडफोन, इअरबड्स वापरणाऱ्या मोठा धोका, सरकारने जारी केला इशारा

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

SCROLL FOR NEXT