ind vs aus twitter
Sports

IND vs AUS,Day 1: कांगारु भिडले, पण बुमराह एकटा नडला! पहिल्या दिवशी काय काय घडलं?; पाहा स्कोअरकार्ड

India vs Australia 4th Test, Day 4: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर सुरु आहे.

Ankush Dhavre

बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दजदार सुरुवात केली आहे. पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाला ६ गडी बाद ३११ धावा करता आल्या आहेत.

मेलबर्नच्या मैदानावर सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना सॅन काँटास आणि उस्मान ख्वाजा ही जोडी मैदानावर आली.

दोघांनी मिळून संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी ८९ धावा जोडल्या. सलामीला फलंदाजी करताना सॅम काँटासने ६० धावांची खेळी केली. तर उस्मान ख्वाजाने ५७ धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मार्नस लाबुशेनने ७२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियासारखी समाधानकारक बाब म्हणजे, टॉप ४ फलंदाजांनी ५० धावांचा आकडा गाठला आहे.

ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ नाबाद आहे. त्याने आतापर्यंत ६८ धावांची खेळी केली आहे. तर अॅलेक्स कॅरीने ३१ धावा केल्या आणि पॅट कमिन्स ८ धावांवर नाबाद आहे. भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने ३ गडी बाद केले. तर आकाशदीप, रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले आहेत.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.

या सामन्यासाठी अशी आहे ऑस्ट्रेलियाची प्लेइंग ११ :

उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, अलेक्स केरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नेथन लायन, स्टॉट बोलंड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mini Kashmir Tourism: महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! विकेंडला निसर्गाच्या कुशीत पार्टनरसोबत घालवा वेळ, रोमॅंटिक ठिकाणी कसं जाल?

विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; तीन नेत्यांचे तडकाफडकी राजीनामे

Crime News : अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या १५ वर्षांच्या मुलाची आईनंच केली हत्या; एक क्लू अन् हादरवून टाकणारा प्लान उघड

दाताच्या समस्यांवर तगडा उपाय! मीठ - पाण्याच्या गुळण्या केल्याने तोंडाची दुर्गंधी आणि हिरड्यांची सूज होईल कमी, असा करा वापर

Maharashtra News Live Update: पेरणीची घाई न करण्याचे निर्देश कृषी विभागातर्फे देण्यात आले असताना शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू

SCROLL FOR NEXT