rohit sharma twitter
Sports

IND vs AUS: बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाची फाईट सुरुच; रोहित - राहुल स्वस्तात माघारी

India vs Australia 4th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातही भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करुन देता आलेली नाही.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मेलबर्नच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाचा डाव फसलेला दिसून येत आहे.

पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथच्या शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ४७४ धावांचा डोंगर उभारला. दरम्यान या धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला सुरुवातीलाच २ मोठे धक्के बसले आहेत.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४७४ धावा केल्या आहेत. या धावांचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची जोडी मैदानावर आली. मात्र या जोडीला हवी तशी सुरुवात करुन देता आलेली नाही. सलामीला आलेला रोहित शर्मा अवघ्या ३ धावा करत माघारी परतला.

भारताला अवघ्या ८ धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी मिळून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या सत्राच्या शेवटच्या चेंडूवर केएल राहुल बाद झाला. फॉर्ममध्ये असलेला केएल राहुल २४ धावा करत माघारी परतला.

ऑस्ट्रेलियाने केल्या ४७४ धावा

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाकडून सॅम कॉन्टासने ६० धावांची शानदार खेळी केली. तर उस्मान ख्वाजाने ५७ धावांची खेळी केली. तर मार्नस लाबुशेनने ७२ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना, स्टीव स्मिथने १४० धावांची खेळी केली. शेवटी पॅट कमिन्सने ४९ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ४७४ धावांपर्यंत मजल मारली.

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर रविंद्र जडेजाने ३ गडी बाद केले. तर आकाश दीपने २ आणि वॉशिंग्टन सुंदरने १ गडी बाद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT