ind vs aus Twitter
Sports

IND VS AUS 4th Test: आर अश्विनच्या पंचकने ऑस्ट्रेलियाच्या इनिंगला लावला फुलस्टॉप! पहिला डाव ४८० धावांवर संपुष्टात..

मालिकेतील अंतिम कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे.

Ankush Dhavre

Ind vs Aus 4th test 1st inning: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४८० धावांवर संपुष्टात आला आहे. (Latest sports updates)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली होती. ऑस्ट्रेलिया संघाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक १८० धावांची खेळी केली.

तर कॅमरुन ग्रीनने ११४ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. शेवटी खालच्या फळीतील फलंदाजांनी देखील मोलाचे योगदान दिले. शेवटी टॉड मर्फीने ४१ आणि लायनने ३१ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने ४८० धावांचा डोंगर उभारला आहे.

आर अश्विनचे पंचक..

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना आर अश्विन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. एकीकडे भारतीय गोलंदाज संघर्ष करताना दिसून येत होते.

तर आर अश्विनने ९१ धावा खर्च करत ६ गडी बाद केले. तर शमीने २ आणि अक्षर, जडेजाने प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मोठा राजकीय घडामोड! भाजपला शिंदे गट जोरदार धक्का देणार?

Central Government: ऐन सणाच्यावेळी केंद्र सरकारनं दिली 'गुड न्यूज', पगार अन् पेन्शनबाबत घेतला मोठा निर्णय

Lalbaugcha Raja 2025 First Look : लालबागच्या राजाची पहिली झलक; भक्तांचा जल्लोष, वातावरण भारावून गेले|VIDEO

Janhvi Kapoor: 'परी म्हणू की सुंदरी...'; फ्लोरल ड्रेसमधील जान्हवीचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का?

Maharashtra Live News Update: कुंभमेळ्याच्या आखाड्यात शिवसेना शिंदे गटाचीही उडी

SCROLL FOR NEXT