rohit sharma twitter/bcci
Sports

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा बॉक्सिंग डे टेस्टसाठी मोठा डाव, टीम इंडियाचे खेळाडू नाराज; नेमकं कारण काय?

Indian Players Unhappy: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या चौथ्या कसोटीपूर्वी भारतीय संघातील खेळाडू नाराज आहेत. नेमकं काय घडलं ? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये रंगणार आहे. हा बॉक्सिंग डे कसोटी सामना असणार आहे.

भारतीय संघाने या सामन्यासाठी कसून सराव करायला सुरुवात केली आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा असं काही केलं आहे. ज्यामुळे भारतीय खेळाडू नाराज असल्याचं दिसून आलं आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

बॉक्सिंग डे कसोटीसाठी भारतीय खेळाडू मैदानात उतरले असून कसून सराव करायला सुरुवात केली आहे. मात्र भारतीय संघाला सराव करण्यासाठी देण्यात आलेल्या खेळपट्टीवरुन भारतीय खेळाडू नाराज आहेत.

दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघाला जुन्या खेळपट्टीवर सराव करावा लागतोय. या खेळपट्टीवर हवा तितका बाऊन्स मिळत नाहीये. त्यामुळे भारतीय खेळाडू नाराज असल्याचे दिसून आले आहे.

या मालिकेत आतापर्यंत ३ कसोटी सामने खेळले गेले आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये गोलंदाजांना चांगला बाऊन्स आणि गती मिळाली नाही. मेलबर्नमध्येही गोलंदाजांना चांगलाच बाऊन्स मिळेल. त्यामुळे भारतीय खेळाडूंना अशी खेळपट्टी हवी होती, ज्यावर बाऊन्स असेल.

मात्र असं काहीच झालेलं नाही. भारताला लो बाऊन्स असलेली खेळपट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना खेळपट्टीचा अंदाज घेणं कठीण झालं आहे. याच कारणामुळे भारतीय फलंदाज नाराज आहेत.

भारतीय संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण ही मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने २९५ धावांनी विजय मिळवला होता.

तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने कमबॅक केलं आणि भारतीय संघावर १० गडी राखून विजय मिळवला. मालिकेतील तिसरा सामना गाबाच्या मैदानावर पार पडला. हा सामना ड्रॉ राहिला होता. आता मालिकेतील चौथा सामना कोण जिंकणार, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Taak Masala Recipe: ताक बनवण्याचा मसाला घरी कसा बनवायचा?

Viral Video: भर रस्त्यात रेड्याचा उच्छाद; स्कूटीस्वाराला हवेत उचलून आपटलं, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Maharashtra Live News Update: जळगावात जिल्ह्यात यलो अलर्ट, जळगावात उष्णतेची लाट

Siddharth Chandekar: सिद्धार्थ चांदेकरला महानगर गॅसच्या नावाने आला फ्रॉड कॉल; अभिनेत्याने कॉलरला म्हणायला लावली मराठी कविता

White Hair Remedy: कॉफी किंवा कोको पावडरने पांढरे केस होतील गायब, आत्ताच वाचा ट्रिक

SCROLL FOR NEXT