indian-cricket-team saam tv news
Sports

IND vs AUS, Playing 11: चौथ्या टी-२० साठी टीम इंडियात होणार बदल! या २ धाकड खेळाडूंना मिळणार प्लेइंग ११ मध्ये स्थान

Team India Playing XI: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांचा थरार सुरू आहे. मालिकेतील चौथा टी -२० सामना आज रायपुरच्या मैदानावर रंगणार आहे.

Ankush Dhavre

India vs Australia 4th T20I:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांचा थरार सुरू आहे. मालिकेतील चौथा टी -२० सामना आज रायपुरच्या मैदानावर रंगणार आहे. या मालिकेत भारतीय संघातील खेळाडू तुफान फॉर्ममध्ये असल्याचे पाहायला मिळाले आहे. (Ind vs Aus Playing 11 )

सुरुवातीचे २ सामने जिंकत भारतीय संघाने मालिकेत २-० ची आघाडी घेतली. तर तिसरा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने दमदार कमबॅक केलं. चौथा टी -२० सामना जिंकून भारतीय संघाला मालिका जिंकण्याची संधी असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघात बदल पाहायला मिळू शकतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये बदल पाहायला मिळू शकतात. शेवटच्या २ सामन्यांसाठी श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं जवळजवळ निश्चित आहे. श्रेयस अय्यर आल्यास तिलक वर्माला प्लेइंग ११ मधून बाहेर केलं जाऊ शकतं. कारण त्याला या मालिकेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्याला वगळता इतर फलंदाजांनी दमदार खेळ केला आहे. (ind vs aus 4th t20 playing 11)

मुकेश कुमारचं कमबॅक...

फलंदाजीसह भारतीय संघाच्या गोलंदाजीतही बदल पाहायला मिळू शकतात. मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यात मुकेश कुमारला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं होतं. त्यानंतर तो लग्नामुळे तिसरा सामना खेळू शकला नव्हता. (Cricket News In Marathi)

त्याच्याऐवजी आवेश खानला संघात स्थान दिलं गेलं होतं. संधीचा फायदा घेत आवेश खानने या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. तर दुसरीकडे प्रसिध्द कृष्णा हा महागडा ठरला होता. त्यामुळे या सामन्यात प्रसिध्द कृष्णाऐवजी मुकेश कुमारला संधी दिली जाऊ शकते. (Latest sports news)

अशी असू शकते प्लेइंग ११:

यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड़, इशान किशन (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार (ind vs aus 4th t20 updates)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Designs: उन्हाळ्याच्या सीझनसाठी खास कॉटन ब्लाउज, पहा शानदार फॅन्सी डिझाइन्स

मुंबईत LPG काळाबाजारावर शिधावाटप विभागाची धाड! वरळीत साठेबाजीचा भंडाफोड; मोठा साठा जप्त

Maharashtra Live News Update: पुण्याहून शिरूरकडे जाणारी ट्रॅव्हल बस पेटली

Fact Check : गॅस टंचाईमुळे मोबाईल बंद होणार? मोबाईलमधील इंटरनेटही चालणार नाही?

Beed Crime : बाहेर खेचलं, उचलून आपटलं; शिक्षणासाठी वेटरचं काम करणाऱ्या तरुणाला टोळक्याची निर्दयी मारहाण

SCROLL FOR NEXT