ind vs aus twitter
Sports

IND vs AUS: गाबाचा घमंड तोडण्यासाठी टीम इंडिया मैदानात! सामना जिंकण्यासाठी अवघ्या इतक्या धावांची गरज

India vs Australia 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाला विजयासाठी आव्हान मिळालं आहे. आता विजयासाठी जाणार, की ड्रॉ साठी हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर सुरु आहेा. या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ७ गडी बाद ८९ धावांवर घोषित केला आहे.

हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला २७५ धावांची गरज आहे. शेवटच्या दिवशी ५४ षटकांचा खेळ शिल्लक आहे.

पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा कहर

या सामन्यातील पाचव्या दिवशी भारतीय संघाचा डाव २६० धावांवर आटोपला. भारताने चौथ्या दिवशीच फॉलोऑन टाळला होता. दरम्यान १८५ धावांनी आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात वेगाने धावा करण्याचा प्रयत्न केला.

मात्र हा प्रयत्न फसला. कारण ऑस्ट्रेलियन फलंदाज एकापाठोपाठ विकेट्स गमावल्या. भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप तिघेही चमकले. भारतासमोर आता २७५ धावांचं आव्हान आहे.

भारतीय फलंदाज हा सामना जिंकण्यासाठी जाणार, की सामना वाचवण्याचा प्रयत्न करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भारतीय संघाने केल्या २६० धावा

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव २६० धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.

मात्र केएल राहुल आणि रविंद्र जडेजाने संघासाठी महत्वपूर्ण खेळी केली. केएल राहुलने या डावात फलंदाजी करताना १३९ चेंडूंचा सामना करत ८४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर रविंद्र जडेजाने १२३ चेंडूंचा सामना करत ७७ धावांची खेळी केली. या दोघांनी भारतीय संघाला सामन्यात कमबॅक करुन दिलं.

जसप्रीत बुमराह- आकाश दीपने टाळळा फॉलोऑन

या सामन्यात भारतीय संघावर फॉलोऑनचं संकट होतं. मात्र जसप्रीत बुमराह आणि आकाश दीपने मिळून फॉलोऑन टाळला. भारतीय संघाला फॉलोऑन टाळण्यासाठी २४६ धावा करायच्या होत्या. त्यावेळी शेवटची जोडी मैदानावर होती.

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी जोरदार आक्रमण केलं. मात्र बुमराह आणि आकाश दीपची जोडी मैदानावर टिकून राहिली. दोघांनी मिळून ३९ धावांची भागीदारी केली आणि फॉलोऑन टाळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT