ind-vs-aus saam tv news
Sports

IND vs AUS, 3rd T20I: विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाची सुमार कामगिरी! सलग २ पराभवानंतर ६ खेळाडूंना केलं संघाबाहेर

India vs Australia 3rd T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने दमदार खेळ करत विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

India vs Australia News:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने दमदार खेळ करत विजय मिळवला आहे.

या विजयासह भारतीय संघाने टी-२० मालिकेत २-० ची आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा सामना आज गुवाहाटीच्या मैदानावर रंगणार आहे. मालिकेत पिछाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी मोठा बदल केला आहे.

तिसऱ्या टी -२० सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघातील अॅडम झाम्पा आणि स्टीव्ह स्मिथ हे दोघेही मायदेशी परतले आहेत. हे दोघेही खेळाडू वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग होते. तर जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस आणि शॉन अबॉट हे उद्या ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यात हे ६ खेळाडू खेळताना दिसून येणार नाही.

ऑस्ट्रेलियाचे हे ६ खेळाडू संघाबाहेर झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची बाजू आणखी कमकुवत झाली आहे. वर्ल्डकप विजेत्या संघातील केवळ ट्रेविस हेड हा भारतीय संघाविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळताना दिसून येणार आहे.

ट्रेविस हेडला भारतीय क्रिकेट फॅन्स कधीच विसरु शकणार नाही. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या फायनलच्या सामन्यात ट्रेविस हेडने १३७ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याने ऑस्ट्रेलियाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.मात्र भारतीय संघाविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ या मालिकेत २-० ने पिछाडीवर आहे. (latest sports updates)

भारतीय संघाविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ:

मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, टिम डेव्हिड, , ख्रिस ग्रीन, आरोन हार्डी, ट्रेविस हेड, बेन मॅकडरमॉट,बेन ड्वार्शुईस, नॅथन एलिस, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : धुक्याने वेढलेले डोंगर अन् निसर्गाचे मनमोहक नजारे, पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट खारघरमधील 'हे' ठिकाण

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

SCROLL FOR NEXT