Rohit Sharma saam Tv
क्रीडा

IND vs AUS: हिटमॅन रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना झोडपलं; ६ षटकार पाहून भरेल धडकी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rohit Sharma Batting:

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मानं आपल्या स्फोटक फलंदाजीनं खळबळ उडवून दिली आहे. रोहितने आक्रमक फलंदाजी करत ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाजांची हवा काढून घेतली. विश्वकप आधी रोहितचा हा फॉर्म पाहून अनेक गोलंदाजांना धडकी भरेल यात शंका नाही. (Latest Sport News )

ऑस्ट्रेलियाच्याविरुद्धात तिसऱ्या एकदिवशीय सामन्यात रोहित शर्मानं दमदार अर्धशतक केलं. दरम्यान रोहितला शतक पूर्ण करण्याची संधी मिळाली नाही पण त्याची फलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना घाम फुटला होता.दरम्यान मॅक्सवेलनं अप्रतिम झेल घेत त्याला बाद केलं. रोहितने ५७ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ षटकार आणि ५ चौकारही लगावले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात रोहितने सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली. त्याची फलंदाजीनं ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांची हवा ढूस केली.

रोहित शर्मानं फक्त ३१ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. आपल्या वैयक्तिक ५० धावांचा टप्पा गाठल्यानंतरही हिटमॅनने फटकेबाजी चालूच ठेवली आहे. यादरम्यान रोहितनं पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कला चांगलेच झोडपलं. दरम्यान मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला ३५३ धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनाही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी झोडपलं.

भारताचा स्टार जलद गतीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह सर्वात महागडा गोलंदाज ठरला. तर फलंदाजीत मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन यांनी ऑस्ट्रेलियाकडून शानदार अर्धशतके झळकावली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali: दिवाळीचा घराचा प्रत्येक कोपरा सजवा अशा पद्धतीने;होईल आर्थिक भरभराट

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

SCROLL FOR NEXT