IND vs AUS Saam tv
Sports

IND VS AUS 2nd Test: टीम इंडियाचं जोरदार कमबॅक!ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६३ धावांवर आटोपला

भारत विरुद्व ऑस्टेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना हा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरु आहे

Saam TV News

IND VS AUS 2nd Test:भारत विरुद्व ऑस्टेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना हा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात दोन्ही संघातील खेळाडूंकडून बरोबरीचा खेळ पाहायला मिळाला. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६३ धावांवर संपुष्ठात आला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाची चांगली सुरुवात..

ऑस्ट्रेलिया संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया संघाकडून डेव्हिड वॉर्नर स्वस्तात माघारी परतल्यानंतर, उस्मान ख्वाजाने जबाबदारी स्वीकारली. त्याने १२५ चेंडूंचा सामना करत ८१ धावांची खेळी केली .

तर स्टीव्ह स्मिथ या सामन्यात मोठी खेळी करेल असा अंदाज व्य्तक केला गेला होता. मात्र तो देखील स्वस्तात माघारी परतला. ऑस्ट्रेलिया संघाकडून पीटर हॅंड्सकॉंबने नाबाद ७२ धावांची खेळी केली. तर कर्णधार पॅट कमिन्सने ३३ आणि मार्नस लाबशेनने १८ धावांचे योगदान दिले. ऑस्टेलियाचा पहिला डाव ७८.४ षटकात २६३ धावांवर संपुष्टात आला.

भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी..

या सामन्यात सुरुवातीला बॅकफूटवर राहिल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले होते. या डावात भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर फिरकी गोलंदाज आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११ :

केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, केएस भरत, अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया :डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉंब, ॲलेक्स कॅरी, पॅट कमिंस, टॉड मर्फी, मॅथ्यु कुन्हेमन आणि नाथन लियॉन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रात्री भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का?

Maharashtra News Live Update: सिंधुदुर्गात पावसाची संततधार सुरू

Rain Alert: पुढचे १० तास महत्वाचे! वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, ताशी ७० ते ८० वेगाने वारे वाहणार; महाराष्ट्रासह १६ राज्यांना इशारा

आधी ज्योतिष्याला OSDपद, आता चित्रपट निर्मात्याची थेट कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं खळबळ

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई ते दिल्लीसह 9 मार्गांवर वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस; सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT