virat kohli twitter
Sports

Virat Kohli Century: शतकांचा दुष्काळ संपला! 'विराट' शतकासह किंग कोहलीने रचला इतिहास; डॉन ब्रॅडमनला सोडलं मागे

India vs Australia 1st Test, Virat Kohli Century: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावलं आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Record, IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं आहे.

या सामन्यात भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात ६ गडी बाद ४८७ धावा केल्या आहेत. यासह भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ५३४ धावांचं आव्हान दिलं आहे. दरम्यान या डावात फलंदाजी करताना विराट कोहलीने शतकांचा दुष्काळ संपवत शानदार शतकी खेळी केली आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात भारताचा डाव लवकर आटोपला होता. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात दमदार कमबॅक केलं. सुरुवातीला केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी शानदार सुरुवात करुन दिली.

केएल राहुलने ७७ धावा केल्या. तर यशस्वी जयस्वालने १६१ धावा केल्या. दोघांनी मजबूत पाया रचल्यानंतर पुढे येणाऱ्या फलंदाजांनी धावांचा डोंगर उभारला. गेल्या काही महिन्यांपासून शतकी खेळीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३० वे शतक झळकावले आहे. विराटने शतक झळकावल्यानंतर भारताने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉन ब्रॅडमनला सोडलं मागे

हे विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील ३० वे शतक ठरले आहे. त्याने शतक झळकावण्याच्या रेकॉर्डमध्ये डॉन ब्रॅडमनला मागे सोडलं आहे. डॉन ब्रॅडमन यांच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये २९ शतक झळकावण्याची नोंद होती. तर मॅथ्यू हेडन आणि शिवनारायण चंद्रपॉलच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ८१ वे शतक

गेल्या काही महिन्यांपासून विराट शतक झळकावण्याच्या प्रतीक्षेत होता. अखेर त्याने शतकांचा दुष्काळ संपवला आहे. या डावात फलंदाजी करताना त्याने १४३ चेंडूंचा सामना करत नाबाद १०० धावांची खेळी केली.

हे विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ८१ वे शतक ठरले आहे. भारतीय संघाने हा डाव ६ गडी बाद ४८७ धावांवर घोषित केला.यासह भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर जिंकण्यासाठी ५३४ धावांचं आव्हान दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT