IND vs AUS 1st T20 Twitter
Sports

IND vs AUS 1st T20: वर्ल्डकपविजेत्या ऑस्ट्रेलियाला 'सूर्या'ग्रहण! यादवच्या स्फोटक खेळीनं रचला विजयाचा पाया, रिंकूच्या षटकाराचा कळस

IND vs AUS 1st T20: पहिल्या टी-२० सामन्यात भारताने वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेतला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आक्रमक खेळी करत विशाखापट्टणमच्या मैदानावर २० षटकात २०८ धावा केल्या.

Bharat Jadhav

IND vs AUS 1st T20 India Won:

पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. अखेरच्या षटकातील १ चेंडू शिल्लक असताना २०९ धावांचे लक्ष्य गाठून टीम इंडियाने शानदार विजयाची नोंद केली. पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारताने वर्ल्डकपमधील पराभवाचा बदला घेतला. (Latest News)

टी२० सामन्याचा हा सामना विशाखापट्टणमच्या वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वातील संघाने पहिला सामना जिंकलाय. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ३ गडी गमावून २०८ धावा केल्या होत्या.या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने टीम इंडियासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने ४२ चेंडूत ८० धावा केल्या. तर इशान किशननेही ५८ धावा केल्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर रिंकू सिंगने २२ धावा करत नाबाद राहिला. रिंकूने विजयी षटकार लगावत भारताला १-० आघाडी मिळवून दिली. सूर्यकुमार यादवला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून घोषित करण्यात आलं. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने २० षटकांत ३ गडी गमावून २०८ धावा करत भारतासमोर २०९ धावांचे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जोश इंग्लिसने ११० धावा केल्या तर स्टीव्ह स्मिथने २२० च्या स्ट्राईक रेटने ५२ धावा केल्या. भारताकडून गोलंदाजी करताना बिश्नोई आणि कृष्णा यांनी प्रत्येकी १ बळी घेतले.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात मात्र खराब राहिली. पहिल्याच ओव्हरमध्ये ऋतुराज गायकवाडच्या रुपात भारताला पहिला धक्का मिळाला. त्यानंतर संघाच्या २२ धावा असताना टीम इंडियाने आपली दुसरी विकेटही गमावली. दुसरी विकेट यशस्वी जयस्वालच्या रुपात गेली होती. त्याने २१ धावा संघासाठी जोडल्या. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इशान किशनने डाव सावरला. इशान किशनने अर्धशतक केलं. इशान बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या रिंकूने तडाखेबाजी फलंदाजी केली. विजयी षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT