IND vs AUS Saam tv
Sports

IND VS AUS 2nd Test:जडेजा अन् अश्विनची जोरदार कामगिरी! ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११३ धावांवर संपुष्टात

या सामन्यातील तिसऱ्याच दिवशी भारतीय गोलंदाजांची जोरदार कामगिरी पाहायला मिळाली आहे.

Saam TV News

IND VS AUS 2nd Test:ऑस्ट्रेलिया विरुध्द भारत या दोन्ही संघामध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील तिसऱ्याच दिवशी भारतीय गोलंदाजांची जोरदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा दुसरा डाव अवघ्या ११३ धावांवर संपुष्टात आला आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला ११५ धावांची आवश्यकता आहे.(Latest Sports Updates)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या होत्या. मात्र या डावात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सुर गवसला नाही. ऑस्ट्रेलिया संघाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली.

तर मार्नस लाबूशेनने ३५ धावांचे योगदान दिले. याशिवाय इतर कुठल्याही फलंदाजाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. या फ्लॉप कामगिरीमुळेच ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या ११३ धावांवर आटोपला.

भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी..

भारतीय संघातील फिरकी गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज नतमस्तक होताना दिसून आले आहेत. या डावात देखील अश्विन आणि जडेजाची जोडी ऑस्ट्रेलिया संघावर भारी पडली. या डावात रवींद्र जडेजाने ४२ धावा खर्च करत ७ गडी बाद केले. तर आर अश्विनने ५९ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. या सामन्यातील पहिल्या डावात आर अश्विनने ३ तर जडेजाने देखील ३ गडी बाद केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coronary artery disease: तुमचं ब्लड प्रेशर नेहमी नॉर्मल; तरीही हृदयातील ब्लॉकेजचा धोका कसा ओळखायचा? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai-Pune Train: पुणे-मुंबईकरांना मोठा दिलासा, १० दिवसांनतर रेल्वे रूळावर; कोणकोणत्या ट्रेन सुरू झाल्या?

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Rain Update : राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या भागातील हवामानाचा अंदाज काय? वाचा

Satara Tourism : महाराष्ट्रातील 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण पाहिलं का? पावसाळ्यात दिसते अधिकच सुंदर

SCROLL FOR NEXT