SUPER OVER CONTROVERSY: SRI LANKAN PLAYERS ALLEGEDLY PUSH VAIBHAV SURYAVANSHI AFTER INDIA A VS SRI LANKA A MATCH saam tv
Sports

IND A vs SL A: सुपर ओव्हरनंतर जोरदार वाद; श्रीलंकेच्या खेळांडूंचा आक्रस्ताळेपणा,वैभव सूर्यवंशीला धक्काबुक्की

Vaibhav Suryavanshi Allegedly Pushed During Post-Match : डंबुला येथे भारत 'अ' आणि यजमान श्रीलंका 'अ' यांच्यात सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ २६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंका 'अ' संघानेही २६५ धावा केल्या, ज्यामुळे सामना बरोबरीत सुटला. पण त्यानंतर भरमैदानात राडा झाला आहे.

Bharat Jadhav

  • भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील सामना २६५-२६५ धावांवर बरोबरीत सुटला.

  • सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमधून लागला.

  • सुपर ओव्हरनंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी आक्रमक जल्लोष केल्याचा आरोप.

श्रीलंकेत भारत 'अ', श्रीलंका 'अ' आणि अफगाणिस्तान 'अ' यांच्यात तिरंगी मालिका सुरू आहे. सोमवारी १५ जून रोजी भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ' यांच्यात सामना झाला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत २६५ धावा केल्या. वरच्या फळीतील एकाही फलंदाजाला विशेष खेळी करता आली नाही. वैभव सूर्यवंशी आणि तिलक वर्मा यांसारखे खेळाडू अपयशी ठरले.

अखेरीस या सामन्याचा निकाल 'सुपर ओव्हर'द्वारे लागला. मात्र या सुपर ओव्हरनंतर श्रीलंका आणि भारतीय खेळाडूमध्ये जोरदार राडा झाला. विजयाचे जल्लोष करताना श्रीलंकेच्या खेळाडूंनी आक्रस्ताळेपणा करत मैदानात राडा घातला. लंकेच्या खेळाडूंनी वैभव सूर्यवंशीला धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भारताची टॉप ऑर्डर ठरली अपयशी

सलामीवीर प्रभसिमरन सिंगने १३ चेंडूंत ११ धावा केल्या, तर त्याच्यासोबत फलंदाजीला आलेल्या वैभव सूर्यवंशीने १४ चेंडूंत २१ धावा केल्या. याव्यतिरिक्त, ऋतुराज गायकवाडने ४२ चेंडूंत ३७ धावा केल्या. कर्णधार तिलक वर्माने ३२ चेंडूंत २३ धावा केल्या आणि आयुष बदोनीला ३५ चेंडूंत १५ धावा करता आल्या. निशांत सिंधूलाही विशेष खेळी करता आली नाही. तो १२ चेंडूंत ६ धावा करून बाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळच्या उमरखेडमध्ये स्फोटात दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

Kalyan: लोकलमधून अचानक ट्रॅकवर पडली 24 वर्षीय तरुणी; रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

Pitru Paksh 2026 : पितृ पक्षात काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

निवडणूक आयोगाचा SIR संदर्भात मोठा निर्णय; महाराष्ट्रासह दिल्लीत दावे, हरकतींसाठी मुदतवाढ

दुष्काळात बळीराजाला मोठा दिलासा! लग्नाचा खर्च उचलणार शिवसेना; शिंदेंनी थेट दिला 'हा' शब्द

SCROLL FOR NEXT