team india, pakistan, usa saam tv
Sports

T20 World Cup, Super 8: पाकिस्तानची एक्झिट फिक्स? भारत अन् अमेरिकेला मिळणार सुपर ८ चं तिकीट; पाहा समीकरण

T20 World Cup 2024, Super 8 Scenario: भारत आणि अमेरिकेला सुपर ८ चं तिकीट मिळू शकतं. तर पाकिस्तानची एक्झिट जवळजवळ निश्चित आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत आज होणारा सामना हा अतिशय महत्वाचा असणार आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि अमेरिकेचा सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होईल. या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला थेट सुपर ८ चं तिकीट मिळणार आहे. तर पाकिस्तान संघाचं भवितव्य देखील याच सामन्यावर अवलंबून असणार आहे.

या हंगामासाठी भारतीय संघाचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात भारतीय संघासह पाकिस्तान, अमेरिका, आयर्लंड आणि कॅनडा या संघांचा समावेश करण्यात आला आहे. सुपर ८ मध्ये जाण्यासाठी भारत आणि अमेरिका या दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत सुरु आहे. तर पाकिस्तानचं भवितव्य या दोन्ही संघांवर अवलंबून आहे.

भारत आणि अमेरिका दोन्ही संघांचे प्रत्येकी ४-४ गुण आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यातील विजेता संघ ६ गुणांसह सुपर ८ मध्ये प्रवेश करेल. मात्र हा सामना जर पावसामुळे रद्द केला गेला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. असे झाल्यास ५-५ गुणांसह दोन्ही संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करतील. तर पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. कारण पाकिस्तानचा १ सामना शिल्लक आहे. हा एक सामना जिंकला, तरीदेखील पाकिस्तानचा संघ ४ गुणांपर्यंत पोहचू शकतो.

भारत- अमेरिका हा सामना सुपर ८ मध्ये जाण्यासाठी निर्णायक सामना असणार आहे. जो संघ जिंकेल तो सुपर ८ मध्ये जाईल. तर पराभूत होणाऱ्या संघाकडे आणखी एक संधी असणार आहे. आज होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला, तर भारतीय संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करेल. मात्र जर पराभव झाला, तर अमेरिकेचा संघ सुपर ८ मध्ये जाईल. भारतीय संघाचा पुढील सामना १५ जून रोजी कॅनडाविरुद्ध होणार आहे.

हा सामना जिंकूनही भारतीय संघ सुपर ८ मध्ये जाऊ शकतो. तर अमेरिकेचा शेवटचा सामना १४ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. अमेरिकेसाठी समाधानकारक बाब अशी की, आजचा सामना गमावला आणि पुढील सामना पावसामुळे रद्द झाला तरीसुद्धा अमेरिकेचा संघ सुपर ८ मध्ये जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

SCROLL FOR NEXT