icc t20 world cup 2024 google
Sports

T-20 World Cup Ad Revenue: IPL च्या तुलनेत T-20 WC फ्लॉप? या ३ कारणांमुळे व्हिव्हरशिपमध्ये २५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता

T20 World Cup Viewership Dropped: आयपीएलच्या तुलनेत आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या व्हिव्हरशिपमध्ये २५ टक्क्यांनी घट होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार सुरु आहे. यावेळी या स्पर्धेचेआ आयोजन अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये केले गेले आहे. या स्पर्धेसाठी न्यूयॉर्कमध्ये अवघ्या ६ महिन्यात नव्याने स्टेडियम उभारण्यात आलं. या स्टेडियममध्ये ड्रॉप इन खेळपट्ट्यांचा वापर केला गेला होता. या खेळपट्टीवर लो स्कोरिंग सामने पाहायला मिळाले. यासह सामन्यांच्या वेळा आणि पावसामुळे आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या व्हिव्हरशिपमध्ये घट झाली आहे.

मीडिया एजेन्सीच्या अधिकाऱ्याने फायनान्शियल एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीत म्हटले की, आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील जाहिरातीतून आणि स्पॉन्सरशिपमधून २ हजार कोटींची कमाई होण्याचा अंदाज होता.मात्र यात आता घसरण झाली असून ही १५०० कोटींवर जाऊन पोहोचली आहे.

साखळी फेरीतील सामन्यांमध्ये रिकामे स्टेडियम असल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. यासह डिजीटल प्लॅटफॉर्मवरही व्हिव्हरशिपमध्ये मोठी घसरण झाली आहे. बुधवारपासून या स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील सामन्यांना प्रारंभ झाला आहे. ज्यात भारत,ऑस्ट्रेलियासह, वेस्टइंडिज, अफगाणिस्तान, अमेरिका, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडने प्रवेश केला आहे. या फेरीत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत. या सामन्यांमधून व्हिव्हरशिप वाढवण्याची उत्तम संधी असणार आहे. या स्पर्धेतील काही महत्वाचे सामने पावसामुळे धुतले गेले. तर काही सामन्यांच्या वेळा या मागे पुढे होत्या. त्यामुळे प्रेक्षकांना हे सामने पाहताच आले नाहीत.

एका अधिकाऱ्याने म्हटले की, '९ जून रोजी भारत- पाकिस्तान सामना पार पडला होता. या सामन्यावेळी व्हिव्हरशिपच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. मात्र इतर सामन्यांमध्ये प्रेक्षकांनी फारसा रस दाखवलेला नाही.'

सुत्राने दिलेल्या माहितीनूसार, भारत -पाकिस्तान सामन्यावेळी डिजीटल प्रेक्षकांची संख्या २९० मिलियन इतकी होती. ही संख्या २०२२ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तानपेक्षा अधिक आहे. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान ही संख्या १८० मिलियन इतकी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT