sourav ganguly Saam TV
Sports

ICC चा पुढील अध्यक्ष कोण? शहा, गांगुली आमने-सामने

आयसीसीचे सध्याचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी आपला कार्यकाळ पुढे चालू ठेवण्यासा इच्छूक नसल्याचं सांगितले आहे.

वृत्तसंस्था

ICC अध्यक्ष पदासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा आमने सामने असणार आहेत. टेलीग्राफच्या एका रिपोर्टनुसार सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि जय शहा (Jay Shah) दोघेही आयसीसीचे अध्यक्ष होण्यासाठी इच्छूक असल्याची माहिती समोर आली आहे. आयसीसीचे सध्याचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी आपला कार्यकाळ पुढे चालू ठेवण्यासा इच्छूक नसल्याचं सांगितले आहे. त्यामुळे आता जय शहा आणि सौरव गांगुली यांच्या शर्यच सुरु झाली आहे.

टेलीग्राफमध्ये असाही दावा केला आहे की सौरव गांगुली आणि जय शहा आयसीसीचे अध्यक्ष पदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत. अगोदर अशा बातम्या आल्या होत्या की २०२३ च्या विश्वचषकादरम्यान बीसीसीआयची इच्छा आहे की आयसीसीचा पुढचा अध्यक्ष भारतीय असावा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे २०११ मध्ये भारताने ज्यावेळी विश्वचषक जिंकला होता त्यावेळी शरद पवार आयसीसीचे अध्यक्ष होते. भारताने २०११ मध्ये विश्वचषक जिंकला होता. बीसीसीआय पुन्हा त्याच तयारीत दिसत आहे. २०२३ मध्ये पुन्हा एकदा विश्वचषक भारतात होणार आहे. त्यामुळेच बीसीसीआयला आयसीसीचा अध्यक्ष भारतीय हवा आहे.

नियमांनुसार, आयसीसी अध्यक्षाची नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते, जी सहा वर्षांपेक्षा जास्त वाढविली जाऊ शकत नाही. सध्या ग्रेग बार्कले हे ICC चे अध्यक्ष आहेत, ज्यांनी डिसेंबर २०२० मध्ये पदभार स्वीकारला होता. ते ऑकलंड येथील व्यावसायिक सल्लागार आहे, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियन कंपन्यांमध्ये ते काम करतात. रिपोर्टनुसार, त्यांची व्यावसायिक बांधिलकी पाहता, बार्कले यांनी त्यांचा कार्यकाळ वाढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आयसीसी नोव्हेंबर २०२२ मध्ये नवीन अध्यक्ष पदाचा चेहरा पाहायला मिळू शकतो.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Thakare : बिग बॉस विजेता शिव ठाकरेने गुपचूप बांधली लग्नगाठ; 'तो' फोटो शेअर करून चाहत्यांना दिली गुडन्यूज

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ₹२००० साठी आताच करा हे काम, अन्यथा २२वा हप्ता विसरा

Maharashtra Live News Update : अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

ZP Elections : मिनी विधानसभेचं बिगुल वाजणार, दोन की एकाच एकाच टप्प्यात निवडणूक? वाचा लेटेस्ट अपडेट

Maharashtra Politics: अजितदादांचा पुणेकरांसाठी मोठा वादा, देवेंद्र फडणीस म्हणाले - 'घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं'

SCROLL FOR NEXT