ICC introduced 5 new rules in international cricket: 
Sports

हेड कोच मैदानात उतरवून आखणार प्लॅन; ICC कडून क्रिकेटच्या ५ नियमात मोठे बदल

ICC introduced 5 new rules in international cricket: आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. अहमदाबाद येथे झालेल्या बोर्डाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेत.

Bharat Jadhav

आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पाच नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केलेत. या जागतिक नियामक संस्थेने ३१ मे रोजी अहमदाबाद येथे झालेल्या बैठकीत या बदलांना मंजुरी देण्यात आली आहे. या नियमांचा परिणाम कसोटी क्रिकेट, टी-२० क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये दिसून येणार आहे. कोणत्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत, ते जाणून घेऊ.

टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील ब्रेक होणार

आयसीसीने केलेल्या बदलांनुसार टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आता १५ मिनिटांचा ब्रेक असणार. दोन डावांमधील ब्रेकचा कालावधी आधी २० मिनिटांचा असायचा, तो आता १५ मिनिटपर्यंत असणार आहे. यामुळे सामना कमी वेळेत संपण्यास मदत होईल. डाव संपल्यानंतर खेळाडूंना लवकर मैदानावर परत येऊन फलंदाजी करता येणं शक्य होणार आहे.

हेड कोच मैदानात येऊ शकतील

आयसीसीने नियामात एक सर्वात मोठा बदल केला आहे. आता आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील ड्रिंक्स ब्रेक दरम्यान संघाचे मुख्य प्रशिक्षक मैदानात येऊ शकतील. खेळाडूंचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ते मैदानात प्रवेश करू शकतील. आतापर्यंत फक्त अतिरिक्त खेळाडूंनाच पेय घेऊन जाण्याची परवानगी होती. आता मुख्य प्रशिक्षक खेळाडूंना कोणताही संदेश थेट पोहोचवू शकतील.

कसोटी सामन्यांमध्ये गुलाबी चेंडूचा वापर

आता कसोटी सामन्यांमध्ये गुलाबी चेंडू महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. अपुऱ्या प्रकाशामुळे सामन्यात व्यत्यय आल्यास, पंचांच्या संमतीने लाल चेंडूऐवजी गुलाबी चेंडूचा वापर केला जाऊ शकतो. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील वैयक्तिक गुणांसाठी असलेल्या तीव्र स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने हा नियम लागू केला आहे.

लेग-साइड वाईडसाठी नवा नियम

आयसीसीच्या बैठकीत लेग-साइड वाईडबाबत एक महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आला. आता जर चेंडू लेग-साइडच्या दिशेने गेला तर तो सरळ वाईड घोषित केला जाणार नाही. यासाठी एक रेषा आखली जाईल, ज्याच्या आधारावर पंच वाईडचा निर्णय घेतील. हा नियम सध्या प्रायोगिक तत्त्वावर राबवला जाणार आहे.

अवैध कृतींसाठी हॉक आय

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजांच्या कृतींबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित होतात. आयसीसीने आता सामना अधिकाऱ्यांना हॉक आय डेटा वापरण्याची परवानगी दिली आहे, ज्यामुळे पंचांना गोलंदाजीच्या कृती प्रत्यक्ष वेळेत तपासता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अबब! मुंबईच्या वरळीत फ्लॅटचं भाडं तब्बल 18 कोटी, VIDEO

कांदा उत्पादक पेटला, महामार्ग रोखला, कांद्याच्या हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर

मोठी बातमी! महायुतीतील बंडखोर माजी आमदाराचा उमेदवारी अर्ज बाद

पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्न? ठाकरे-पवारांसारखा ममतांचाही पक्ष फुटणार? तृणमूलचे 50 आमदार बंडखोरीच्या तयारीत?

पुण्यात रक्तरंजित थरार; चारित्र्याच्या संशयातून 'लिव्ह-इन'मधील तरुणीला निर्घृणपणे संपवलं

SCROLL FOR NEXT