ICC Champions Trophy 2025 Schedule  India Today
Sports

Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता - उपविजेता संघ होणार मालामाल; पाकिस्तानलाही पैसे मिळणार; पण किती?

Champions Trophy Prize Money: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला किती प्राईज मनी मिळेल? जाणून घ्या.

Ankush Dhavre

चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये जाणारे दोन्ही संघ ठरले आहेत. फायनलसाठी मैदान तयार आहे. जगभरातील क्रिकेट फॅन्सला, कोणता संघ जेतेपदाची ट्रॉफी उंचावणार याची प्रतिक्षा आहे. तब्बल २९ वर्ष वाट पाहिल्यानंतर पाकिस्तानला पहिल्यांदाच आयसीसीच्या स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते.

मात्र पाकिस्तानचा संघ सर्वात आधी या स्पर्धेतून बाहेर पडला. तर ऑस्ट्रेलियाला हरवून भारतीय संघ या स्पर्धेतील फायनलमध्ये पोहोचला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला हरवून फायनलचं तिकीट मिळवलं आहे. दरम्यान ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला किती प्राईज मनी मिळणार? जाणून घ्या.

चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाला किती प्राईज मनी मिळणार?

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून २.२४ मिलियन डॉलर्स म्हणजे, १९.५ कोटीत रुपये दिले जाणार आहेत. यासह विजेत्या संघाला सोनेरी रंगाची चॅम्पियन्स ट्रॉफी दिली जाईल. तर उपविजेत्या संघाला ९.७५ कोटी रुपये दिले जाणार आहेत.

सेमीफायनल गाठणारा संघही होणार मालामाल

केवळ फायनल गाठणाऱ्या नव्हे, तर सेमीफायनल गाठणाऱ्या संघावरही पैशांचा वर्षाव केला जाणार आहे. सेमीफायनलमध्ये पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना प्रत्येकी ४.८५ कोटी रुपये दिले जाणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी ६० कोटींचा बजेट ठरवण्यात आला होता. हा बजेट २०१७ मध्ये दिलेल्या प्राईज मनीपेक्षा ५३ टक्क्यांनी अधिक आहे.

विजेत्या- उपविजेत्या संघाला किती पैसे मिळणार?

विजेता संघ- १९.५ कोटी

उपविजेता संघ- ९.७५ कोटी

सेमीफायलन - प्रत्येकी ४.८५ कोटी

पाचव्या/ सहाव्या स्थानी - ३ कोटी रुपये

सातव्या / आठव्या स्थानी - १.२ कोटी रुपये

भारत- न्यूझीलंड फायनलमध्ये भिडणार

या स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन फायनलमध्ये दाखल झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंदिरातून कधीही 'या' वस्तू घरी आणू नका; वाईट शक्ती पाठ सोडणार नाही

Thailand Bangkok Shooting : भर बाजारात अंदाधुंद गोळीबार! ६ जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःवरही झाडली गोळी

Skin Care Tip: बटाटा लावा आणि चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

Pune Crime News : पुणे हादरलं !सासरवाडीत जाऊन पतीने केली पत्नीची हत्या; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT