ind vs pak saam tv
क्रीडा

Champions Trophy 2025: टीम इंडियाचा पाकिस्तानात जाण्यास नकार! या देशात होणार सामने

ICC Champion Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा थरार पाकिस्तानमध्ये रंगणार आहे.

Ankush Dhavre

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. आयसीसीने ही घोषणा केल्यानंतर एकच प्रश्न उपस्थित केला जातोय. तो म्हणजे, भारतीय संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार का? यापू्र्वीही भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाणं टाळलं आहे.

आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डला मोठा धक्का दिला आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नाहीये. लकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला आहे. बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डला याबाबत कल्पना दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

त्यामुळे भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवले जाऊ शकतात. भारताचे विदेश मंत्री एस जयशंकर पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार असल्याची चर्चा रंगायला सुरुवात झाली होती. मात्र आता या चर्चांना जवळजवळ पूर्णविराम लागला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, पाकिस्तानने भारताला पाकिस्तानमध्ये बोलवण्यासाठी पूर्ण जोर लावला. मात्र याचा काहीच फयदा झाल नाही. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने भारतासाठी खास प्लान केला होता. भारतीय संघाने सामने खेळण्यासाठी पाकिस्तानात यावं आणि त्यानंतर पुन्हा मायदेशी परतावं, असा पाकिस्तानचा प्लान होता. मात्र बीसीसीआयने हा प्लान फेटाळून लावला.

भारतीय संघ जर पाकिस्तानात खेळण्यासाठी जाणार नसेल, तर हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का असणार आहे. कारण याने पाकिस्तानचं आर्थिक नुकसान होईल. चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार असल्याने, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पैसा ओतून स्टेडियमचं नुतणीकरण केलं. मात्र भारतीय संघ जर पाकिस्तानात येणार नसेल, तर हा पैसा पाण्यात जाऊ शकतो.

यापूर्वी आशिया चषक स्पर्धेचे यजमानपदही पाकिस्तानकडे होते. मात्र बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्यात आली होती. भारतीय संघाचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवली जाऊ शकते. भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवले जाऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT