ind vs sa saam tv news
Sports

T20 World Cup 2024: न्यूयॉर्कमध्ये रंगणार IND vs PAK सामन्याचा थरार! तारीख आताच नोट करुन ठेवा

T20 World Cup 2024 Schedule: टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. येत्या जूनमध्ये वेस्टइंडीज आणि अमेरिकेत या स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

Ankush Dhavre

India vs Pakistan Cricket Match Date:

टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. येत्या जूनमध्ये वेस्टइंडीज आणि अमेरिकेत या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने वेळापत्रकाची घोषणा केली आहे. भारतीय संघ ५ जून रोजी आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

त्यानंतर ९ जून रोजी भारत - पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेला १ जूनपासून प्रारंभ होणार असून भारतीय संघ साखळी फेरीत ४ सामने खेळणार आहे.

केव्हा होणार सुरुवात?

आगामी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेचे यजमानपद वेस्टइंडीज आणि अमेरिकेकडे आहे. या स्पर्धेची सुरुवात कॅनडा आणि अमेरिका यांच्यातील सामन्याने होणार आहे. १ ते १८ जूनदरम्यान साखळी फेरीतील सामन्यांचा थरार रंगणार आहे. तर १९ ते २४ जून दरम्यान सुपर -८, २६ आणि २७ जून रोजी सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. तर २९ जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. (Latest sports updates)

असं असेल स्वरूप..

या स्पर्धेसाठी २० संघ पात्र ठरले आहेत. या चारही संघांना ए पासून डी अशा ४ गटात विभागलं गेलं आहे. या ४ गटांमध्ये प्रत्येकी ५-५ संघ असणार आहेत. भारतीय संघ ए गटात असून भारतीय संघासह पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिकेचा ए गटात समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघाचे साखळी फेरीतील ३ सामने न्यूयॉर्कमध्ये खेळला जाणार आहे. तर एक सामना फ्लोररिडामध्ये खेळला जाणार आहे.

या स्पर्धेसाठी असं आहे भारतीय संघाचं वेळापत्रक

भारत विरुद्ध आयर्लंड - ५ जून

भारत विरुद्ध पाकिस्तान - ९ जून

भारत विरुद्ध अमेरिका - १२ जून

भारत विरुद्ध कॅनडा - १५ जून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांच्या सभापदी पदाचे आरक्षण जाहीर

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

अपघातात मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी केक कापला; स्मशानभूमीतच वडिलांकडून लेकीचं वाढदिवस साजरा

Political News : भाजपचं टेन्शन वाढलं, बिहारमध्ये जागावाटपावरून केंद्रीय मंत्री नाराज, थेट ऑफर धुडकावली

SCROLL FOR NEXT