rishabh pant twitter
Sports

ICC Test Rankings: रिषभ पंत सुस्साट...विराट कोहलीलाही सोडलं मागे! रोहितला मोठा धक्का

ICC Test Ranking: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका सुरु असताना आयसीसीने कसोटी रँकिंगची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

Rishabh Pant, ICC Test Rankings: भारत- न्यूझीलंड कसोटी मालिका सुरु असताना आयसीसीने कसोटी रँकिंगची घोषणा केली आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत रिषभ पंतने मोठी झेप घेतली आहे. या यादीत रिषभ पंतने विराट कोहलीलाही मागे सोडलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत रिषभ पंतने ९९ धावांची शानदार खेळी केली होती. दरम्यान रिषभ पंत या यादीत सहाव्या स्थानी पोहोचला आहे.

कोण कितव्या स्थानी ?

इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटने आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. रुटने पाकिस्तानविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यातही चांगली कामगिरी केली आहे. तर विराट कोहली आठव्या स्थानी सरकला आहे. तर यशस्वी जयस्वाल चौथ्या स्थानी कायम आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मालाही फटका बसला आहे. तो श्रीलंकेच्या दुमिथ करुणारत्नेसह संयुक्तरित्या १५ व्या स्थानी आहे.

रचिनची मोठी झेप

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीत रचिन रविंद्रची बॅट चांगली चमकली. त्याने भारतीय गोलंदाचांचा चांगलाच समाचार घेत शतकी खेळी केली. या खेळीचा त्याला आयसीसी रँकिंगमध्ये चांगलाच फायदा झाला आहे. या सामन्यापूर्वी रचिन ३६ व्या स्थानी होता. आता तो १८ व्या स्थानी पोहोचला आहे. तर शतकी खेळी करणारा डेवोन कॉन्व्हे ३६ व्या स्थानी पोहोचला आहे.

गोलंदाजांमध्ये बुमराह अव्वल

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीत गोलंदाजी करताना ८ गडी बाद करणाऱ्या मॅट हेनरीचाही चांगलाच फायदा झाला आहे. हेनरी गोलंदाजांच्या यादीत ९ व्या स्थानी पोहोचला आहे. तर पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यात शानदार गोलंदाजी करणारा पाकिस्तानचा गोलंदाज नोमान अली १७ व्या स्थानी पोहोचला आहे. तर साजिद खान ५० व्या स्थानी पोहोचला आहे. भारताचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह या यादीत अव्वल स्थानी आहे. तर आर अश्विन दुसऱ्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'कॉक्रोच'वर दंगलीचा आरोप? व्हीआयपींच्या गाडीवर दगडफेक? काय आहे व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य?

टेन्शन वाढलं! तुमच्या LICचे 350 कोटी बुडणार? देशात 15 लाख कोटींचा महाघोटाळा?

Pune News: पुण्यात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, आई- वडील अन् मुलाचा दुर्दैवी मृत्यू

कोकणात ठाकरेसेना नामशेष? कोकणात ठाकरेसेनेला गळती सुरूच

कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीत आंदोलन, जेन-झींच्या आंदोलनाला परवानगी मिळणार?

SCROLL FOR NEXT